शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सानिया, काराला अजिंक्यपद

By admin | Updated: October 27, 2014 02:00 IST

स्पर्धेत तृतीय मानांकन प्राप्त सानिया आणि कारा यांनी द्वितीय मानांकित प्रतिस्पर्धी जोडीवर ५९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या दुहेरी लढतीत ६-१, ६-० अशी सरशी साधली़

सिंगापूर : भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसह खेळताना डब्ल्यूटीए फायनल्सच्या अंतिम फेरीत चीनची पेंग शुआई आणि चिनी तैपेईच्या सीह सू वेई या जोडीवर शानदार विजय मिळवून अजिंक्यपदाचा मान मिळविला़ स्पर्धेत तृतीय मानांकन प्राप्त सानिया आणि कारा यांनी द्वितीय मानांकित प्रतिस्पर्धी जोडीवर ५९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या दुहेरी लढतीत ६-१, ६-० अशी सरशी साधली़ विशेष म्हणजे सानिया आणि कारा या जोडीचा हा अखेरचा किताब ठरला आहे़ कारण यानंतर या दोन्ही खेळाडू दुहेरीत वेगवेगळ्या जोडीदारांसह खेळणार आहेत़ भारताच्या सानियाने पहिल्यांदाच डब्ल्यूटीए फायनल्सला पात्रता मिळविली होती़ तिने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना या वर्षाचा शानदार समारोप केला़ युएस ओपनच्या मिश्र दुहेरीचा किताब आपल्या नावे करणाऱ्या सानिया आणि कारा यांना स्पर्धेच्या उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत सुपर टायब्रेकपर्यंत झुंजावे लागले होते; मात्र फायनलमध्ये या जोडीने चमत्कारिक खेळ करीत सामन्यात बाजी मारली़ सानिया आणि कारा यांनी गत चॅम्पियन चीन आणि चिनी तैपेईच्या खेळाडूंची सामन्यात ६ वेळा सर्व्हिस भेदली़ संपूर्ण सामन्यात भारत आणि झिम्बाब्वेच्या खेळाडूंचा दबदबा राहिला़ प्रतिस्पर्धी खेळाडूंना या लढतीत तोंड वर करण्याची संधीच मिळाली नाही़सानियाचा डब्ल्यूटीए फायनल्समधील हा पहिलाच किताब आहे़ दुसरीकडे ११ व्यांदा स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या काराचे स्पर्धेतील हे तिसरे अजिंक्यपद आहे़ काराने येथे २००० ते २००९ पर्यंत सलग सहभाग नोंदविला होता़ तिने यापूर्वी २००७ आणि २००८ मध्ये स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते़स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यामुळे सानिया आणि कारा यांना मार्टिना नवरातिलोव्हा हिच्या नावावर ठेवण्यात आलेली ट्रॉफी प्रदान करण्यात आली़ या जोडीचा १३ महिन्यांतील ५ वा किताब आहे़ दुसरीकडे यावर्षी २४-९ अशी विक्रमी कामगिरी करणाऱ्या वेई आणि शुआई यांना सत्रातील चौथा किताब आपल्या नावे करता आला नाही़ यापूर्वी त्यांनी दोहा, इंडियन्स वेल्स आणि फ्रेंच ओपनमध्ये दुहेरीचे जेतेपद मिळविले होते़ त्यामुळे या जोडीला डब्ल्यूटीए फायनल्सच्या जेतेपदाचे दावेदार मानले जात होते; मात्र ही जोडी फायनलमध्ये भारत आणि झिम्बाब्वेजोडीपुढे काहीच करू शकली नाही़ (वृत्तसंस्था)