सायनाला फुल‘राणी’साठी नामांकन

By Admin | Updated: December 5, 2015 00:40 IST2015-12-05T00:40:29+5:302015-12-05T00:40:29+5:30

स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला यंदा विश्व बॅडमिंटन महासंघाच्या वर्षातील ‘सर्वोत्कृष्ट बॅडमिंटन’पटू पुरस्काराच्या यादीत नामांकन मिळाले आहे. सध्या दुसऱ्या स्थानावर असलेली

Saina's nomination for 'Full Rani' | सायनाला फुल‘राणी’साठी नामांकन

सायनाला फुल‘राणी’साठी नामांकन

दुबई : स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला यंदा विश्व बॅडमिंटन महासंघाच्या वर्षातील ‘सर्वोत्कृष्ट बॅडमिंटन’पटू पुरस्काराच्या यादीत नामांकन मिळाले आहे. सध्या दुसऱ्या स्थानावर असलेली सायना काही वेळ जगात अव्वल स्थानावर होती हे विशेष. या पुरस्काराच्या चढाओढीत सायनासोबत अव्वल स्थानावर विराजमान असलेली स्पेनची कॅरोलिना मारिन, चीनची झाओ युन्लेई आणि चाओ यिक्सिन यांचा समावेश आहे. विजेत्या खेळाडूच्या नावाची घोषणा ७ डिसेंबर रोजी दुबईत होणाऱ्या दुबई विश्व सुपरसिरिज फायनन्सदरम्यान केली जाईल.

Web Title: Saina's nomination for 'Full Rani'