सायना, श्रीकांतचा सलग दुसरा विजय

By Admin | Updated: December 19, 2014 00:56 IST2014-12-19T00:56:09+5:302014-12-19T00:56:09+5:30

भारताचा उदयोन्मुख स्टार बॅडमिंटनपटू के. श्रीकांत आणि सायना नेहवाल यांनी विश्व सुपर सिरीज फायनल बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी सलग दुसरा विजय मिळविताना उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली.

Saina, Srikanth win second consecutive win | सायना, श्रीकांतचा सलग दुसरा विजय

सायना, श्रीकांतचा सलग दुसरा विजय

दुबई : भारताचा उदयोन्मुख स्टार बॅडमिंटनपटू के. श्रीकांत आणि सायना नेहवाल यांनी विश्व सुपर सिरीज फायनल बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी सलग दुसरा विजय मिळविताना उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली.
जागतिक क्रमवारील आठव्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतने ‘ब’ गटाच्या लढतीत इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्तोचा ३८ मिनिटे रंगलेल्या लढतीत २१-१८, २१-१३ ने पराभव केला. या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या श्रीकांतने बुधवारी १ तास खेळल्या गेलेल्या संघर्षपूर्ण लढतीत जपानच्या केंतो मोमोतोची झुंज १५-२१, २१-१६, २१-१३ ने मोडून काढली होती. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालाने कामागिरीत सातत्य राखताना ‘अ’ गटाच्या लढतीत कोरियाच्या सुंग जी ह्यूनचा २१-१२, २१-१८ ने पराभव केला. यापूर्वी सायनाने पहिल्या लढतीत शिजियान वांगवर २१-१७, २१-१८ ने सरशी साधत स्पर्धेत विजयी सलामी दिली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina, Srikanth win second consecutive win