सायना नेहवाल टॉप फाईव्हमध्ये

By Admin | Updated: November 1, 2014 00:39 IST2014-11-01T00:39:39+5:302014-11-01T00:39:39+5:30

ताज्या क्रमवारीत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने एका स्थानाची झेप घेऊन टॉप फाईव्हमध्ये एंट्री केली आहे.

Saina Nehwal top five | सायना नेहवाल टॉप फाईव्हमध्ये

सायना नेहवाल टॉप फाईव्हमध्ये

नवी दिल्ली : विश्व बॅडमिंटन महासंघाने (बीडब्लूएफ) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने एका स्थानाची झेप घेऊन टॉप फाईव्हमध्ये एंट्री केली आहे. या महिन्यात पार पडलेल्या डेन्मार्क आणि फ्रेंच ओपन स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केल्याचा सायनाला फायदा झाला. या दोन्ही स्पर्धात तिला जागतिक क्रमवारीत दुस:या स्थानावर असलेल्या चीनच्य शिजियान वांगकडून पराभव पत्करावा लागला होता. या क्रमवारीत  भारताच्या पी. व्ही. सिंधूने दहावे स्थान कायम राखले आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Saina Nehwal top five