सायना नेहवालचा दिसणार जलवा

By Admin | Updated: January 17, 2015 02:51 IST2015-01-17T02:51:45+5:302015-01-17T02:51:45+5:30

२० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सय्यद मोदी ग्रां़प्री़ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू सायना नेहवाल

Saina Nehwal to appear | सायना नेहवालचा दिसणार जलवा

सायना नेहवालचा दिसणार जलवा

लखनऊ : २० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सय्यद मोदी ग्रां़प्री़ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू सायना नेहवाल आणि विश्व चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मार्टिन यांच्यासह अनेक अनुभवी खेळाडूंचा जलवा दिसणार आहे़
उत्तर प्रदेश बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष आलोक रंजन यांनी सांगितले की, २० पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत विद्यमान चॅम्पियन आणि आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना
नेहवाल, कॅरोलिना मार्टिन यांच्याव्यतिरिक्त अनुभवी खेळाडू पी़ व्ही.सिंधूचा सहभाग असेल़ सायनाला अव्वल, कॅरोलिनाला द्वितीय, तर सिंधूला तृतीय मानांकन देण्यात आले आहे़
स्पर्धेतील पुरुष गटात भारताचा आघाडीचा खेळाडू आणि अव्वल मानांकित के़ श्रीकांत, पी़ कश्यप, तसेच विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेता डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसेन आपले नशीब आजमावणार आहे़ स्पर्धेची पात्रता फेरी २० जानेवारी रोजी सुरू होईल़ मुख्य स्पर्धा २१ रोजी तर फायनल २५ जानेवारी रोजी होणार आहे, असेही रंजन यांनी सांगितले़ (वृत्तसंस्था)

Web Title: Saina Nehwal to appear