जपान ओपन सीरिजवर सायनाच्या नजरा

By Admin | Updated: September 8, 2015 04:36 IST2015-09-08T04:36:33+5:302015-09-08T04:36:33+5:30

विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवणारी जगातील नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आता जपान ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे.

Saina eyes on Japan Open Series | जपान ओपन सीरिजवर सायनाच्या नजरा

जपान ओपन सीरिजवर सायनाच्या नजरा

टोकीयो : विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवणारी जगातील नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आता जपान ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेत साजेशी कामगिरी करून किताब पटकाविण्याचे आव्हान तिच्यापुढे असेल. २ लाख ७५ हजार डॉलर रकमेची ही स्पर्धा आहे.
२५ वर्षीय सायनाने गेल्या महिन्यात विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकाविले होते. याच कामगिरीच्या आधारावर तिने पुन्हा एकदा नंबर वनचा ताज पटकाविला होता. स्पर्धेत दुसरी मानांकित सायना आता आपल्या मोहिमेची सुरुवात बुधवारी थायलंडच्या बुसानन ओंगबुमरुंगपानविरुद्धच्या सामन्याने करणारा आहे. या सामन्यात तिने विजय मिळवल्यास पुढील फेरीत तिची लढत मायदेशाच्या पी. व्ही. सिंधूविरुद्ध होईल. असे झाल्यास, आंतरराष्ट्रीयस्तरावर सायना आणि सिंधू हे पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील.
याआधी, २०१४ मध्ये इंडिया ग्राप्री गोल्ड फायनलमध्ये दोन्ही खेळाडू आमने-सामने ठाकल्या होत्या. ज्यात सायनाने बाजी मारली होती. पहिल्या सामन्यात सिंधू हिला जगातील १८
वी मानांकित जपानची
मिनात्सु मितानी हिच्याविरुद्ध खेळावे लागेल.
पुरुष एकेरीत, राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेता पारुपल्ली कश्यप आपल्या मोहिमेची सुरुवात ताकुआ उएदा याच्याविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. जगातील आठव्या क्रमांकाचा कश्यप याने ताकुआला दोन वेळा पराभूत केले आहे. मात्र, २०१३ मध्ये जपानच्या याच खेळाडूने सिंगापूर ओपनमध्ये कश्यपला
हरविले होते. त्यामुळे हा सामनासुद्धा रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina eyes on Japan Open Series