शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सायनाच्या पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात

By admin | Updated: May 30, 2015 01:47 IST

जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू आणि विद्यमान चॅम्पियन सायना नेहवाल हिला शुक्रवारी येथे उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या वाँग शिजियान हिच्याकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला.

सिडनी : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू आणि विद्यमान चॅम्पियन सायना नेहवाल हिला शुक्रवारी येथे उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या वाँग शिजियान हिच्याकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. तिच्या पराभवाबरोबरच भारताचे आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.येथे द्वितीय मानांकित सायनाला आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी चीनच्या खेळाडूंकडून २१-१५, २१-१३ असा पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना ४२ मिनिटांपर्यंत रंगला. आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाचा येथे दोन वेळेस आॅल इंग्लंड चॅम्पियन वाँगविरुद्ध १२ व्या सामन्यातील सहावा पराभव ठरला. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकाला चांगलीच झुंज दिली. सायना एकवेळ ४-२ अशी आघाडीवर होती; परंतु त्यानंतर सहाव्या मानांकित चिनी खेळाडूने तिच्यावर वर्चस्व राखले. तथापि, एक वेळ १0-१४ अशा पिछाडीवर असताना सायनाने सलग चार गुण घेताना १४-१४ अशी बरोबरी साधली.तथापि, त्यानंतर वाँगने भारतीय खेळाडूला आपल्यावर वरचढ होऊ न देता सलग सहा गुण घेताना पहिला गेम जिंकला.दुसऱ्या गेममध्येही चीनच्या खेळाडूने ३-१ अशी आघाडी घेत चांगली सुरुवात केली. सायनाने मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला; परंतु वाँगने तिला लय मिळू दिली नाही. तथापि, दोन्ही खेळाडूंत पुढे जाण्याची चांगलीच चुरस रंगली. सायनाने यादरम्यान एका गुणाची निसटती आघाडी घेतली; परंतु ती तिची लय कायम ठेवू शकली नाही. भारतीय खेळाडूने केलेल्या चुकीचा पूर्ण फायदा वाँगने घेतला आणि सलग सहा गुण घेताना १४-१0 आणि नंतर १८-११ अशी आघाडी वाढवली. सायनाने नंतर दोन गुण घेतले; परंतु चिनी खेळाडूने तिला मुसंडी मारण्याची संधी मिळू न देता सलग तीन गुण घेताना दुसरा गेम आणि सामनाही जिंकला.सायनाच्या या पराभवाने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीतील चौथा मानांकित किदाम्बी श्रीकांत याचे एकेरीतील, तसेच ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा या महिला दुहेरीतील जोडीचे आव्हान आधीच संपुष्टात आले होते. (वृत्तसंस्था)