शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सायना-सिंधूसह ७ बॅडमिंटनपटू पात्र

By admin | Updated: May 4, 2016 03:56 IST

आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यासह ७ बॅडमिंटनपटू ब्राझीलच्या रिओमध्ये यंदा आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले

नवी दिल्ली : आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यासह ७ बॅडमिंटनपटू ब्राझीलच्या रिओमध्ये यंदा आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंची एकूण संख्या आता ८६ झाली आहे. लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदकविजेती सायना व सिंधू (विश्व क्रमवारीत अनुक्रमे आठवे व दहावे स्थान) यांचा अव्वल १० खेळाडूंमध्ये समावेश आहे. किदांबी श्रीकांत पुरुष एकेरीच्या क्रमवारीत ११व्या स्थानी, तर महिला दुहेरीची जोडी ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा १५व्या स्थानी आहे. मनू अत्री व बी. सुमीत रेड्डी पुरुष दुहेरीच्या मानांकनामध्ये १९व्या स्थानी आहेत. या सात खेळाडूंनी बॅडमिंटन स्पर्धेसाठी रिओ आॅलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. भारताचे मुख्य बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद म्हणाले, ‘‘पात्रता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमच्याकडे सरावासाठी जवळजवळ आठ आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. खेळाडूंसाठी हा कालावधी पुरेसा आहे. मला या वेळी अधिक पदकांची आशा आहे. लंडन आॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत भारतातर्फे एकमेव कांस्यपदक सायना नेहवालने पटकावले होते.’’भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात सर्वांत अधिक खेळाडूंनी या वेळी पात्रता मिळवली आहे. ही संख्या २०१२च्या आॅलिम्पिकमध्ये पाच होती. या वेळी यात दोनची भर पडली असून, सात झाली आहे. भारतातर्फे यात आणखी एका खेळाडूची भर पडू शकली असती; पण पारुपल्ली कश्यपवर गेल्या महिन्यात शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे तो आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला. याव्यतिरिक्त भारतीय भारोत्तोलकांनी महिला व पुरुष विभागांत प्रत्येकी एक कोटा स्थान मिळविले आहे. २०१२च्या आॅलिम्पिकमध्ये एकूण ८३ भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. त्यांत ६० पुरुष व २३ महिला खेळाडूंचा समावेश होता. या वेळी हा आकडा ८६ पर्यंत पोहोचला आहे. त्यात ४८ पुरुष व ३८ महिला खेळाडूंचा समावेश अहे. रिओसाठी भारतीय पथकाचे प्रमुख असलेले राकेश गुप्ता म्हणाले, ‘‘सात बॅडमिंटनपटू रिओसाठी पात्र ठरणे मोठी बाब आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या अन्य खेळाडूंनाही त्यामुळे प्रेरणा मिळेल. भारत्तोलनामध्ये भारताने दोन कोटा स्थान मिळवली असून भारोत्तोलकांच्या नावाची घोषणा निवड चाचणीनंतर केली जाईल. आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या खेळाडूंच्या संख्येत आणखी भर पडणार असून हा आकडा १०० पर्यंत जाण्याची आशा आहे.’’गुप्ता पुढे म्हणाले, ‘‘रिओसाठी पात्रता मिळवणारे खेळाडू प्रशंसेस पात्र आहेत. विश्व मानांकन, पात्रता प्रक्रिया आणि आंतरराष्ट्रीय महासंघ व आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे मापदंड पूर्ण केल्यानंतरच खेळाडू आॅलिम्पिकसाठी पात्र ठरतो.’’भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये आणखी कोटा मिळविण्याची संधी आहे. त्यासाठी पुढच्या महिन्यात चाचणी होईल. याव्यतिरिक्त दोन पुरुष व एक महिला गोल्फरला पात्रता यादीमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. टेनिसमध्येही लवकरच काही मोठी नावे रिओ आॅलिम्पिकच्या पात्रता यादीमध्ये दिसतील. बॉक्सिंगमध्येही भारताला आशा आहे. टेनिसमध्ये २०१२च्या आॅलिम्पिकसाठी पाच पुरुष व दोन महिला खेळाडूंसह एकूण ७ खेळाडू पात्र ठरले होते. भारताने तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, रोइंग, जिम्नॅस्टिक्स, नेमबाजी, टेबल टेनिस, भारोत्तोलन आणि कुस्ती आदी क्रीडाप्रकारांसाठी पात्रता मिळविली आहे. (वृत्तसंस्था)