सचिन, सौरव, लक्ष्मणचा BCCIच्या सल्लागार समितीत समावेश

By Admin | Updated: June 1, 2015 13:42 IST2015-06-01T13:34:00+5:302015-06-01T13:42:14+5:30

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या भारतीय क्रिकेटमधील तीन दिग्गजांचा बीसीसीआयच्या सल्लागार समितीत समावेश करण्यात आला आहे.

Sachin, Sourav, Laxman included in BCCI's advisory committee | सचिन, सौरव, लक्ष्मणचा BCCIच्या सल्लागार समितीत समावेश

सचिन, सौरव, लक्ष्मणचा BCCIच्या सल्लागार समितीत समावेश

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या भारतीय क्रिकेटमधील तीन दिग्गजांचा बीसीसीआयच्या ( भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) सल्लागार समितीत समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली असून बीसीसीआयच्या ऑफिशअल ट्विटर अकाऊंटवरही ही घोषणा करण्यात आली आहे. 
क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिनचा तेंडुलकर, टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार सौरव गांगुली आणि अतिशय भरवशाचा तसेच शैलीदार फटकेबाजी करणारा अशी ओळख असणारा व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या तीन दिग्गजांच्या समावेशामुळे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना भविष्यात मोठा फायदा होईल. या तिघाही दिग्गजांना एकदिवसीय, कसोटी तसेच टी-२० या तिनही प्रकारच्या सामन्यांचा सेच देशात व विदेशात खेळल्याचा प्रचंड अनुभव आहे. त्यामुळे भारतीय संघाला क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमध्ये तसेच विदेश दौ-यात खेळताना फायदा होईल अशी अपेक्षा आहे. तसेच पुढील विश्वचषकापर्यंतच्या दीर्घ मुदतीचा विचार केला तर त्यादृष्टीने अत्यंत भक्कम संघ उभारणीसाठी सचिन, सौरव व लक्ष्मण मोलाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे.

Web Title: Sachin, Sourav, Laxman included in BCCI's advisory committee