शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंजर्सविरुद्ध रॉयल्सचे पारडे जड

By admin | Updated: April 24, 2015 09:29 IST

सलग तीन पराभवांना सामोरे गेलेल्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शुक्रवारी आयपीएल-८ मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला राजस्थान रॉयल्स वर्चस्व गाजविण्याची शक्यता आहे.

अहमदाबाद : सलग तीन पराभवांना सामोरे गेलेल्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शुक्रवारी आयपीएल-८ मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला राजस्थान रॉयल्स वर्चस्व गाजविण्याची शक्यता आहे.सहापैकी पाच सामने जिंकणाऱ्या राजस्थानचे दहा गुण आहेत. त्यांचा किंग्स इलेव्हन पंजाबकडून एकमेव पराभव झाला होता. ही लढत टाय झाल्यानंतर सुपरओव्हरमध्ये पंजाबने बाजी मारली. दुसरीकडे चारपैकी तीन सामने गमविणारा चॅलेंजर्स संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्यांना एकमेव विजय मिळाला होता.किमान कागदावर बंगळुरूकडे सर्वाधिक आक्रमक फलंदाजी आहे. पण सांघिक खेळ करण्यात त्यांना अपयश आले. विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, रिली रोसोयू हे स्वत:च्या बळावर सामना जिंकून देऊ शकतात; पण स्पर्धेवर अद्याप छाप उमटवू शकले नाहीत. कोहली आणि डिव्हिलियर्स यांनी काही सामन्यांत चमक दाखविली; पण संघाची धुरा ज्याच्या खांद्यावर आहे त्या गेलने चक्क निराशा केली. चेन्नईविरुद्ध कालच्या सामन्यात तो बाहेर बसला होता. विश्वचषकात स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकविणारा मिशेल स्टार्क याचा वेगवान मारा निष्प्रभावी ठरला. दुसरीकडे राजस्थान पहिल्या सामन्यापासून फॉर्ममध्ये आहे. अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन यांनी चांगली सुरुवात दिली तर स्टीव्ह स्मिथने मध्यम फळीला भक्कम केले. मागच्या सामन्यात मात्र हा संघ पंजाबकडून पराभूत होताच काही उणिवा चव्हाट्यावर आल्या. राजस्थानने काल १९१ धावा उभारल्या; पण गोलंदाजांनी दिशाहीन मारा केल्याने सामना हातून गेला. स्टुअर्ट बिन्नी आणि जेम्स फॉल्कनर यांना गोलंदाजीत बरीच काळजी घ्यावी लागेल. (वृत्तसंस्था)