शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची अंतिम फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2016 23:40 IST

आयपीएलच्या क्वालिफायर राऊंडमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं गुजरात लायन्सवर 4 गडी राखून दणदणीत विजय मिळवला

 ऑनलाइन लोकमत

बंगलोर, दि. 24- आयपीएलच्या क्वालिफायर राऊंडमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं गुजरात लायन्सवर 4 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. आरसीबीनं 158 धावांचा पाठलाग करताना 18.2 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा करून विजय खेचून आणला आहे.
बंगलोरकडून ए. बी. डिव्हिलियर्सनं नाबाद खेळी करत भेदक फलंदाजीच्या जोरावर शेवटपर्यंत टिकून राहत 5 चौकार आणि 5 षटकार मारत अर्धशतक पार करत 79 धावांची खेळी केली. कॅप्टन विराट कोहली भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यानंतर मैदानात उतरलेला ख्रिस गेल 9, वॅटसन 1, बेबी 0 आणि बिन्नी 21 धावांवर बाद झाला. तर, अब्दुल्लानं नाबाद 33 धावांची खेळी केली.  त्याआधी गुजरात लायन्सनं निर्धारित 20 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या होत्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातकडून स्मिथनं सर्वाधिक धावांची खेळी करत 5 चौकार आणि 6 षटकार लगावत अर्धशतक पार करत 73 धावा केल्या. तर फिंच 4, मॅक्युलम 1, रैना 1, जडेजा 3, ब्राव्हो 8, द्विवेदी 19, कुमार 1, कुलकर्णी 10 धावा काढून तंबूत परतले. कार्तिकही 30 चेंडूंत 26 धावांची खेळी करून माघारी फिरला. कार्तिक आणि स्मिथनं भेदक फलंदाजीच्या जोरावर 85 धावांची भागीदारी केली. बंगलोरकडून उत्तम गोलंदाजीच्या जोरावर वॅटसननं रैना, जडेजा, द्विवेदी आणि ब्राव्होला घरचा रस्ता दाखवला. तर अब्दुल्ला, जॉर्डननं भेदक गोलंदाजी करत प्रत्येकी 2 गडी मिळवले.