शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शर्मा, पार्थिव पटेल कर्णधार

By admin | Updated: March 22, 2017 00:18 IST

देवधर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी रोहित शर्मा आणि पार्थिव पटेल यांना अनुक्रमे इंडिया ब्ल्यू आणि इंडिया रेड या संघांच्या कर्णधारपदी नियुकत

नवी दिल्ली : देवधर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी रोहित शर्मा आणि पार्थिव पटेल यांना अनुक्रमे इंडिया ब्ल्यू आणि इंडिया रेड या संघांच्या कर्णधारपदी नियुकत करण्यात आले आहे. विजय हजारे चषक स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे हरभजन सिंग याला २८ खेळाडंूच्या यादीत स्थान मिळाले आहे. महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर सुरेश रैनाचा यादीत समावेश नाही. त्यामुळे रैनाच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या स्पर्धेत विजय हजारे चषक विजेता तमिळनाडू हा तिसरा संघ असणार आहे. पार्थिव रेड संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक असेल, तर रिषभ पंत ब्ल्यू संघाचा यष्टीरक्षक असेल. हरभजनने मुश्ताक अली चषक आणि हजारे चषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्याला देवधर ट्रॉफीसाठी निवडण्यात आले आहे. याचा अर्थ असाही होतो की, इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या नावावर गांभिर्याने विचार केला जाऊ शकतो.संघ असे आहेत :- इंडिया ब्लू : रोहित शर्मा (कर्णधार), मनदीप सिंह, श्रेयस अय्यर, अंबाती रायुडु, मनोज तिवारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, हरभजन सिंह, कृणाल पंड्या, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, शार्दुल ठाकुर, प्रसिद्ध कृष्णा आणि पंकज राव.इंडिया रेड : पार्थिव पटेल (कर्णधार व यष्टीरक्षक), शिखर धवन, मनीष पांडे, मयंक अग्रवाल, केदार जाधव, इशांक जग्गी, गुरकीरत मान, अक्षर पटेल, अक्षय कर्णीवार, अशोक डिंडा, कुलवंत खजूरिया, धवल कुलकर्णी आणि गोविंदा पोद्दार.