रॉजर फेडररला पराभवाचा धक्का

By Admin | Updated: November 23, 2014 02:21 IST2014-11-23T02:21:57+5:302014-11-23T02:21:57+5:30

फ्रान्स आणि स्वित्ङरलड यांच्यात सुरू असलेल्या डेव्हिस चषक फायनल सामन्यात स्टार खेळाडू रॉजर फेडररवर फ्रान्सच्या गेल मान्फिल्सकडून पराभवाची नामुष्की ओढवली;

Roger Federer defeats defeat | रॉजर फेडररला पराभवाचा धक्का

रॉजर फेडररला पराभवाचा धक्का

लिली : फ्रान्स आणि स्वित्ङरलड यांच्यात सुरू असलेल्या डेव्हिस चषक फायनल सामन्यात स्टार खेळाडू रॉजर फेडररवर फ्रान्सच्या गेल मान्फिल्सकडून पराभवाची नामुष्की ओढवली; मात्र फेडररचा पराभव होऊनही या मुकाबल्यात स्वित्ङरलडने फ्रान्ससोबत बरोबरी साधली आह़े
17 ग्रँडस्लॅम आपल्या नावे करणारा 33 वर्षीय फेडरर पहिल्यांदाच डेव्हिस कप फायनलमध्ये खेळत आह़े त्याला फ्रान्सच्या गेल मान्फिल्सकडून 6-1, 6-4, 6-3 ने मात खावी लागली़ 
स्पर्धेतील अन्य लढतीत फेडररचा साथीदार स्टेन वावरिंका याने फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगाला 6-1, 3-6, 6-3, 6-2 अशा फरकाने धूळ चारली़ त्यामुळे हे दोन्ही देश मुकाबल्यात 1-1 अशा बरोबरीत आहेत़ स्वित्ङरलडचा फेडरर म्हणाला, ‘‘पाठीच्या दुखापतीने ग्रासले असतानाही या लढतीत तीन सेटर्पयत खेळू शकलो, याचे समाधान आह़े पुढच्या सामन्यात सरशी साधून आम्ही स्पर्धेत जोरदार मुसंडी मारू, असा विश्वास आह़े’’ (वृत्तसंस्था)

 

Web Title: Roger Federer defeats defeat