‘अर्जुन’साठी शिफारस गौरवाची बाब : रोहित

By Admin | Updated: April 28, 2015 00:30 IST2015-04-28T00:30:39+5:302015-04-28T00:30:39+5:30

बीसीसीआय’तर्फे अर्जुन पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आल्यामुळे आनंद झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या रोहित शर्माने ही माझ्यासाठी गौरवाची बाब असल्याचे म्हटले आहे.

Recommendation for Arjuna: | ‘अर्जुन’साठी शिफारस गौरवाची बाब : रोहित

‘अर्जुन’साठी शिफारस गौरवाची बाब : रोहित

मुंबई : ‘बीसीसीआय’तर्फे अर्जुन पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आल्यामुळे आनंद झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या रोहित शर्माने ही माझ्यासाठी गौरवाची बाब असल्याचे म्हटले आहे.
रोहित म्हणला, ‘बीसीसीआयने या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस केल्यामुळे आनंद झाला. रविवारी हे वृत्त ऐकल्यानंतर चांगले वाटले.’ बीसीसीआयने रविवारी कोलकाता येथे झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत अर्जुन पुरस्कारासाठी रोहितचे नाव पाठविण्याचा निर्णय घेतला. रोहितने गेल्या मोसमात श्रीलंकेविरुद्ध विक्रमी २६४ धावांची खेळी केली होती. वन-डे क्रिकेट इतिहासात दोन द्विशतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा रोहित म्हणाला, ‘यंदाच्या मोसमात संघाची कामगिरी विशेष चांगली झालेली नसली तरी दोन दिवसांपूर्वी हैदराबाद संघाविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल, अशी आशा आहे. आम्हाला चांगली फलंदाजी करण्याची संधी होती. गोलंदाजांनी या लढतीत आम्हाला विजय मिळवून दिला. आगामी सामन्यांमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे.
रोहित पुढे म्हणाला, ‘हेजलवुडने सुरुवातीलाच स्पर्धेतून माघार घेतली असून आता अँडरसनने माघार घेतल्यामुळे आम्हाला धक्का बसला, पण त्यामुळे कोलिन मुन्रो (न्यूझीलंड) आणि मिशेल मॅक्लेनघन यांना छाप सोडण्याची संधी मिळाली आहे.’

‘यंदाच्या मोसमात संघाची कामगिरी विशेष चांगली झालेली नसली तरी दोन दिवसांपूर्वी हैदराबाद संघाविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल, अशी आशा आहे.’
- रोहित शर्मा,
कर्णधार , मुंबई इंडियन्स

Web Title: Recommendation for Arjuna: