शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कुकला सापडली फॉर्मची रेसिपी

By admin | Updated: July 28, 2014 03:28 IST

कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकला (९५ धावा, २३१ चेंडू, ९ चौकार) सूर गवसला असला तरी त्याला शतक झळकाविण्यात अपयश आले;

साउथम्पटन : कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकला (९५ धावा, २३१ चेंडू, ९ चौकार) सूर गवसला असला तरी त्याला शतक झळकाविण्यात अपयश आले; पण गॅरी बॅलन्स (नाबाद १०४ धावा, २०४ चेंडू, १५ चौकार) कारकिर्दीतील तिसरे शतक झळकाविण्यात यशस्वी ठरला. कुक व बॅलन्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या १५८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर रविवारपासून प्रारंभ झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडने भारताविरुद्ध वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात २ बाद २४७ धावांची दमदार मजल मारली. आजचा खेळ थांबला त्यावेळी शतकवीर बॅलन्सला इयान बेल (१६) साथ देत होता. कुकने सुरुवातीला मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेत ९५ धावांची खेळी केली तर बॅलन्सने (नाबाद १०४) शतक झळकाविले. दुखापतीमुळे ईशांत शर्माला या कसोटीतून माघार घ्यावी लागली. ईशांतच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजीची बाजू कमकुवत झाली. पहिल्या दिवशी केवळ मोहम्मद शमी (१-६२) आणि रवींद्र जडेजा (१-३४) यांना बळी मिळविता आले. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत चमकदार कामगिरी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने ५८ धावा बहाल केल्या; पण बळीचा विचार करता त्याची पाटी कोरीच राहिली. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या पंकज सिंगला ६२ धावांच्या मोबदल्यात बळी घेता आला नाही. त्याला नशिबाची साथ लाभली नाही. त्याच्या गोलंदाजीवर जडेजाने कुकचा सोपा झेल सोडला. त्यावेळी कुक केवळ १५ धावांवर होता. अखेर जडेजाने कुकला शतकापासून रोखण्यात यश मिळविले. चहापानानंतर शतकाकडे वाटचाल करणारा कुक जडेजाच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल देत माघारी परतला. कुक पंच मारियास इरासमुसच्या निर्णयावर निराश दिसला. कुकने २३१ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार ठोकले. त्याआधी, कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने वैयक्तिक १५ धावांवर मिळालेल्या जीवनदानाचा लाभ घेत इंग्लंडला उपाहारापर्यंत १ बाद ७४ धावांची मजल मारून दिली. अर्धशतकाकडे वाटचाल करताना कुकने सूर गवसल्याचे संकेत दिले. त्याआधी, पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या पंकज सिंगच्या गोलंदाजीवर कुकचा उडालेला झेल तिसऱ्या स्लिपमध्ये तैनात जडेजाला टिपण्यात अपयश आले. जडेजाने त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सॅम रोबसनचा (२६) कठीण झेल टिपताना या चुकीची काही अंशी भरपाई केली. त्याआधी, नाणेफेकीपूर्वी टाचेच्या दुखापतीमुळे ईशांत शर्माने या लढतीतून माघार घेतली. त्याच्या स्थानी राजस्थानच्या पंकज सिंगला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. भारतीय संघाने स्टुअर्ट बिन्नीच्या स्थानी रोहित शर्माला संघात स्थान दिले. (वृत्तसंस्था)