शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या विजयास आरसीबी सज्ज

By admin | Updated: April 13, 2015 03:30 IST

सलामी लढतीत गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा धक्का देणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा आत्मविश्वास उंचावला असून

बंगलोर : सलामी लढतीत गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा धक्का देणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा आत्मविश्वास उंचावला असून सोमवारी त्यांना सनराईजर्स हैदराबाद संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बेंगळुरू संघ गृहमैदानावर वर्चस्व गाजवण्यास उत्सुक आहे.गेल व डिव्हिलियर्स या आक्रमक फलंदाजांच्या उपस्थितीनंतरही लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ पुढील तीन सामन्यांत गृहमैदानावर खेळण्याचा लाभ घेण्यास प्रयत्नशील आहे. केकेआरविरुद्ध ९६ धावांची खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा ख्रिस गेल गृहमैदानावर आक्रमक फलंदाजीचा नजराणा सादर करण्यास उत्सुक आहे. आरसीबी संघाचा फलंदाजी क्रम कुठल्याही प्रतिस्पर्धी संघावर दडपण निर्माण करण्यास सक्षम आहे. गेल, डिव्हिलियर्स आणि कोहली यांच्या उपस्थितीत आरसीबीची आघाडीची फळी कागदावर सर्वांत आक्रमक भासते. आयपीएल २०१५ च्या लिलावामध्ये १२ कोटी ५० लाख रुपयांमध्ये करारबद्ध झालेला यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक संघाचा समतोल साधण्यास सक्षम आहे. आॅस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क व न्यूझीलंडचा अ‍ॅडम मिल्ने यांच्या अनुपस्थितीत आरसीबीची गोलंदाजीची बाजू कमकुवत भासते. केकेआरविरुद्धच्या लढतीत सीन एबट सर्वांधिक महागडा ठरला. त्याने ३ षटकांत ३६ धावा बहाल केल्या. एबट व अ‍ॅरोन चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहेत. आरसीबी संघात अशोक डिंडाचाही समावेश आहे, पण त्याला अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळते का, याबाबत उत्सुकता आहे. फिरकी गोलंदाजीची भिस्त यजुवेंद्र चाहलवर राहील. त्याने केकेआरविरुद्ध चार षटकांत २९ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला होता. (वृत्तसंस्था)