शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

आरसीबीने युवराजला केले ’बंधमुक्त’

By admin | Updated: December 16, 2014 01:19 IST

जब तक बल्ला चल रहा है, तब तक थाट है..’ हे युवराजसिंगचे एका जाहिरातीमधील शब्द त्याच्याच बाबतीत खरे ठरताना दिसत आहेत

नवी दिल्ली : ‘जब तक बल्ला चल रहा है, तब तक थाट है..’ हे युवराजसिंगचे एका जाहिरातीमधील शब्द त्याच्याच बाबतीत खरे ठरताना दिसत आहेत, कारण २0११ च्या विश्वविजयाचा हिरो २0१५ च्या वर्ल्डकपसाठी संघात स्थान मिळवण्यास अपयशी ठरला असतानाच आयपीएलमध्येही त्याची ‘व्हॅल्यू’ घसरली आहे. आयपीएलच्या इतिहासात १४ कोटीची विक्रमी किंमत देवून ज्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने त्याला विकत घेतले त्यांनी आयपीएलच्या आठव्या सत्रासाठी त्याला बंधमुक्त (रिलीज) केले आहे.
आयपीएलच्या आठव्या सत्रासाठी खुली करण्यात आलेली ट्रेडिंग विंडो आज बंद करण्यात आली. युवराजसह ज्या मोठ्या खेळाडूंना रिलीज करण्यात आले त्यामध्ये केव्हीन पीटरसन, दिनेश कार्तिक, मुरली विजय (दिल्ली) आणि चेतेश्वर पुजारा (पंजाब) यांचाही समावेश आहे.
अनुभवी हरभजन सिंग व वीरेंद्र सेहवाग त्यांचे संघ अनुक्रमे मुंबई इंडियन्स व किंग्ज इलेव्हन पंजाब संघांसोबत कायम आहेत. डेअरडेव्हिल्स आता लिलावामध्ये ४१ कोटी रुपयांच्या रकमेसह उतरणार आहे. आठ फ्रॅन्चायझींपैकी चेन्नई सुपरकिंग्जने सर्वांत कमी चार खेळाडूंना करारमुक्त केले. सुपरकिंग्जने बेन हिल्फेन्हॉस, जॉन हास्टिंग्स, विजय शंकर व डेव्हिड हसी यांना करारमुक्त केले. डेअरडेव्हिल्सनंतर सनरायजर्स हैदराबादने सर्वांत अधिक १० खेळाडूंना करारमुक्त करण्याच्या निर्णय घेतला. आरसीबीला लिलावासाठी २१ कोटी ५० लाख रुपये तर सनरायजर्सला
२१ रुपये उपलब्ध राहणार आहेत.
सनरायजर्सने गेल्या मोसमात अधिक काळ दुखापतग्रस्त असलेल्या इरफान पठाणला करारमुक्त केले, पण त्यांच्या यादीत डॅरेन सॅमी व अ‍ॅरोन फिंच यांच्यासारख्या आश्चर्यचकित करणाऱ्या नावांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)