शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

रायडूचे तडाखेबंद शतक; भारताची त्रिशतकी मजल

By admin | Published: January 10, 2017 5:46 PM

अंबाती रायडूचे तडाखेबंद शतक आणि शिखर धवन, युवराज सिंग व कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा अर्धशतकी तडाखा या जोरावर भारत ‘अ’ संघाने पहिल्या सराव सामन्यात इंग्लंड

- रोहित नाईक
मुंबई, दि. 10 -  अंबाती रायडूचे तडाखेबंद शतक आणि शिखर धवन, युवराज सिंग व कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा अर्धशतकी तडाखा या जोरावर भारत ‘अ’ संघाने पहिल्या सराव सामन्यात इंग्लंड इलेव्हन संघाविरुध्द निर्धारीत ५० षटकात ४ बाद ३०४ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाचे अखेरचे नेतृत्वपद सांभाळलेल्या धोनीने ४० चेंडूत नाबाद ६८ धावा काढताना उपस्थित क्रिकेटचाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. तर, त्याआधी रायडू ९७ चेंडूत १०० धावांची खेळी करुन रिटायर्ड हर्ट झाला.
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात कर्णधार धोनीचे अखेरचे ‘कूल’ नेतृत्व पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठी उपस्थिती दर्शविली. सुरुवातीला  उत्तरेकडील आणि पुर्वेकडील स्टँड खुले केल्यानंतर हळूहळू पश्चिम स्टँडदेखील खुले करण्यात आल्यानंतर स्टेडियम जवळपास भरुन गेले. भारतीयांच्या प्रत्येक चौकारावर जल्लोष होत असला तरी, प्रेक्षकांना प्रतीक्षा होती ती धोनीच्या फटकेबाजीची. त्यामुळेच जेव्हा मनदीप सिंग आणि शिखर धवन बाद झाले तेव्हा प्रेक्षकांनी मोठा जल्लोष केला.
परंतु, धवननंतर आलेल्या युवराज सिंगने अडखळत्या सुरुवातीनंतर शानदार फटकेबाजी करीत प्रेक्षकांना खुश केले. युवी.. युवी अशा जयघोषानंतर पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना जुना युवराज पाहण्यास मिळाला. त्याने ४८ चेंडूत ६ चौकार व २ षटकार मारत ५६ धावांची दमदार खेळी केली. तर, ४१व्या षटकात रायडूने आपले शतक पुर्ण केल्यानंतर मैदान सोडण्याचा निर्णय घेतला आणि आगमन झाले कर्णधर धोनीचे..
यावेळी प्रेक्षकांनी धोनीचा जयघोष करीत स्टेडियम दणाणून सोडले. धोनीने देखील आपल्या चाहत्यांना खुश करताना अखेरपर्यंत नाबाद राहत ४० चेंडूत ८ चौकार व २ षटकरांसह ६८ धावा केल्या.
तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून इंग्लंड कर्णधार इआॅन मॉर्गन याने क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर मनदीप सिंग (८) झटपट परतला. मात्र, धवन - रायडू यांनी संघाला सावरताना दुसºया विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली. जॅक बॉलने धवनला बाद करुन ही जोडी फोडली. धवन ८४ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह ६३ धावा काढून परतला. यानंतर रायडू - युवराज यांनी तिसºया विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. रायडू शतक झळकावून रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर युवी, धोनी यांनी भारत ‘अ’ संघाला तीनशेचा पल्ला पार करुन दिला. 
 
धावफलक :
भारत  ‘अ’ : मनदीप सिंग त्रि. गो. विली ८, शिखर धवन झे. बटलर गो. बॉल ६३, अंबाती रायडू रिटायर्ड हर्ट १००, युवराज सिंग झे. रशिद गो. बॉल ५६, महेंद्रसिंग धोनी नाबाद ६८, संजू सॅमसन झे. हेल्स गो. विली ०, हार्दिक पांड्या नाबाद ४. अवांतर - ५. एकूण : ५० षटकात ४ बाद ३०४ धावा.
गोलंदाजी : ख्रिस वोक्स १०-१-७१-०; डेव्हीड विली १०-१-५५-२; मोईन अली १०-०-४२-०; जॅक बॉल १०-०-६१-२; आदिल रशिद ८-०-४९-०; लियाम डॉसन २-०-२४-०.