नागपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 15:57 IST2016-06-23T15:57:44+5:302016-06-23T15:57:56+5:30

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीसोबत वेळोवेळी शरिरसंबंध प्रस्थापित करणा-या तरुणावर गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Rape by showing lacquer in Nagpur | नागपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

नागपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २३ -  लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीसोबत वेळोवेळी शरिरसंबंध प्रस्थापित करणा-या तरुणावर गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अभिजीत कुशालराव जवादे (वय ३१) असे आरोपीचे नाव आहे. तो यवतमाळ जिलह्यातील पुसद येथील रहिवासी आहे.
तक्रारदार तरुणी २७ वर्षांची आहे. ती येथे भाड्याच्या खोलीत राहते. तीन वर्षांपूर्वी तिचे आणि  अभिजीतचे सूत जुळले. त्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. २४ एप्रिल २०१४ ला पहिल्यांदा या दोघांनी बसस्थानकासमोरच्या हॉटेल राहूलमध्ये स्वसंमतीने एकमेकाशी शरिरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मनात येईल तेव्हा हे दोघे शरिरसंबंध प्रस्थापित करू लागले. फिर्यादी तरुणीच्या रुमवर ते पती-पत्नीसारखे राहत होते. दरम्यान, क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वादविवाद सुरू झाले. त्यामुळे आरोपी अभिजीतने तिला फेब्रुवारी २०१६ पासून टाळणे सुरू केले. लग्नासही नकार दिला. त्यामुळे तरुणीने गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अभिजीतची चौकशी सुरू आहे. 

Web Title: Rape by showing lacquer in Nagpur