शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानच रॉयल...

By admin | Updated: April 11, 2015 04:35 IST

जेम्स फॉल्कनरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने शुक्रवारी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर २६ धावांनी मात करून विजयी सलामी दिली

विशाल शिर्के, पुणेजेम्स फॉल्कनरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने शुक्रवारी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर २६ धावांनी मात करून विजयी सलामी दिली. राजस्थानने विजयासाठी दिलेले १६३ धावांचे आव्हानदेखील पंजाबला पेलवले नाही. त्यांना २० षटकांत ८ बाद १३६ धावाच करता आल्या. जेम्स फॉल्कनरने ४६ धावा केल्या आणि ३ बळी घेत सामनावीराचा पुरस्कार मिळविला. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मैदानावर शुक्रवारी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. होम ग्राऊंड असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार जॉर्ज बेलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवून पंजाबने राजस्थानच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले. धावा रोखताना विकेट घेण्याची कामगिरीदेखील गोलंदाजांनी केली. मात्र स्टीवन स्मिथ (२३ चेंडूत ३३ धावा), दीपक हुडा (१५ चेंडू ३० धावा) व जेम्स फॉल्कनर (३२ चेंडूत ४६ धावा) यांनी उत्कृष्ट फलंदाजी करीत संघाचा धावफलक १६२ वर नेण्यात मोलाची भूमिका बजावली. या माफक आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग (०) टीम साऊदीच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनकडे झेल देऊन परतला. त्यानंतर मुरली विजय व रिद्धिमान साहा यांनी खेळाची सूत्रे हाती घेतली. मात्र तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सॅमसनने साहाला धावबाद केले. पाठोपाठ धोकादायक ठरु शकणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलचा (७) अडसर जेम्स फॉल्कनरने दूर केला. मॅक्सवेल साऊदीकडे झेल देवून परतला. त्यामुळे पंजाबची अवस्था ३ बाद ४६ अशी झाली. एकाबाजूने खिंड लढविणारा मुरली विजय (३२ चेंडंूत ३७ धावा) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्यापूर्वी विजयने ४ चौकार व एका षटकाराच्या सहाय्याने आपली खेळी साजरी केली. अक्षर पटेल (२४) याला टीम साऊदीने त्रिफळाबाद करीत केले. पाठोपाठ मिचेल जॉन्सनला फॉल्कनरने भोपळाही फोडू दिला नाही. त्यांनतर जॉर्ज बेलीला (१८ चेंडूत २४ धावा) फॉल्कनरने त्याच षटकांत तंबूत धाडले. सीमारेषेपलीकडे जाणारा उत्तुंग फटका टीम साउदीने मैदानात फेकला. तितक्या चपळाईने नायरने झेल टिपत बेलीला झेलबाद केले आणि पंजाबच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या.