शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राफेल नदाल चॅम्पियन

By admin | Updated: June 12, 2017 00:54 IST

लाल मातीचा बादशाह असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने रोलां गॅरोवर लौकिकाला साजेशी कामगिरी करताना अंतिम

पॅरिस : लाल मातीचा बादशाह असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने रोलां गॅरोवर लौकिकाला साजेशी कामगिरी करताना अंतिम लढतीत स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाचा पराभव केला आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत विक्रमी १० व्यांदा जेतेपद पटकावले. नदालने वावरिंकाचा ६-२, ६-३, ६-१ ने सहज पराभव केला. एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत विक्रमी १० वेळा जेतेपद पटकावण्याची कामगिरी करणारा तो पहिला टेनिसपटू ठरला. कारकिर्दीतील २२ व्या ग्रॅण्डस्लॅम अंतिम फेरीत खेळत असलेल्या नदालने फ्रेंच ओपनमध्ये तिसऱ्यांदा सेट न गमावता जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याने केवल ३५ गेम्स गमावले. त्यात अंतिम लढतीमध्ये गमावलेल्या सहा गेम्सचाही समावेश आहे. नदाल व वावरिंका यांच्यादरम्यान रंगलेल्या अंतिम लढतीत स्पेनच्या खेळाडूने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले आणि अखेरपर्यंत कायम राखले. १९६९ नंतर प्रथमच अंतिम फेरीत ३० वर्षांवरील खेळाडूंदरम्यान लढत झाली. वावरिंकाला पहिल्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये ब्रेक पॉर्इंटची संधी मिळाली, पण त्यानंतर नदालने कुठलीच संधी न देता वर्चस्व गाजवले. वावरिंकाने सुरुवातीला नदालला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. त्याने चौथ्या गेममध्ये चार ब्रेक पॉर्इंट्सचा बचाव केला आणि २-२ अशी बरोबरी साधली. नदालने त्यानंतर सर्व्हिस कायम राखली आणि वावरिंकाची सर्व्हिस भेदत ४-२ अशी आघाडी घेतली. वावरिंकाने आपल्या सर्व्हिसवर फोरहँडचा फटका बाहेर मारताना १७ व्यांदा टाळण्याजोगी चूक करीत गुण गमावला. नदालने ४४ मिनिटांमध्ये पहिल्या सेटमध्ये सरशी साधली. नदालने दुसऱ्या सेटममध्ये शानदार सुरुवात केली. त्याच्या फोरहँडच्या फटक्यांपुढे वावरिंकाचा बचाव निष्प्रभ ठरला. वावरिंकाचा फोरहँडचा फटका नेटममध्ये गेल्यामुळे नदालने २-० अशी आघाडी घेतली. नदालने त्यानंतर सर्व्हिस कायम राखत दुसरा सेट सहज जिंकला. वावरिंकाला राग अनावर झाल्यामुळे त्याने आपली रॅकेट कोर्टवर आपटली. तिसऱ्या सेटच्या पहिल्या गेममध्ये नदालने पुन्हा एकदा २०१५ चा चॅम्पियन वावरिंकाची सर्व्हिस भेदली. त्यानंतर नदालने ४-१ अशी आघाडी घेतली. नदालने सर्व्हिस कायम राखत आघाडी वाढविली. वावरिंकाचा बॅकहँडचा फटका नेटवर गेल्यामुळे नदालचे विजेतेपद निश्चित झाले.