शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला हवे ‘विन रायझिंग’

By admin | Updated: April 29, 2016 02:41 IST

रायझिंग पुणे सुपरजायंट्सला स्पर्धेतील आपले स्थान भक्कम करण्यासाठी विजयपथावर येणे आवश्यक आहे.

पुणे : रायझिंग पुणे सुपरजायंट्सला स्पर्धेतील आपले स्थान भक्कम करण्यासाठी विजयपथावर येणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी त्यांना गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या गुजरात लायन्सचे तगडे आव्हान परतवून लावावे लागेल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुक्रवारी (दि. २९) ही लढत होत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध विजय मिळविल्यानंतर सलग चार सामन्यांत पुणे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात डकवर्थ लुईस पद्धतीने पुणे संघाने विजय मिळविला असला तरी आव्हान कायम राखण्यासाठी पुढील सामन्यात विजय मिळविणे आवश्यक आहे. गुजरातने या हंगामात चांगली कामगिरी केली असून, त्यांच्या नावावर सहा सामन्यांत ५ विजय आहेत. केवळ सनरायजर्स संघाविरुद्ध त्यांचा पराभव झाला आहे. गुजरात लायन्सने पुण्याला राजकोट येथील सामन्यात ७ गडी राखून मात दिली होती. या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी पुण्याकडे आहे. लायन्सकडे अ‍ॅरॉन फिंच, ब्रँडन मॅक्युलम व कर्णधार सुरेश रैना यांसारखे तगडे फलंदाज आहेत. फिंच दुखापतीने त्रस्त असला तरी त्या जागी ड्वेन स्मिथने आपली भूमिका चोख बजावली आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स विरोधात त्याने केवळ ३० चेंडूत ५२ धावांची तडाखेबाज खेळी केली. गोलंदाजीत ड्वेन ब्राव्हो, धवल कुलकर्णी यांनी चांगली कामगिरी केली असून, त्यांच्या नावावर अनुक्रमे सात व सहा बळी आहेत. प्रवीण तांबे व रवींद्र जडेजा या फिरकीपटूंनी अनुक्रमे पाच व चार बळी घेत त्यांना चांगली साथ दिली आहे. पुण्यासाठी अजिंक्य रहाणे व फाफ डू प्लेसिस या सलामीच्या जोडीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. अजिंक्यने २२३ व प्लेसिसने २०६ धावा फटकावल्या आहेत. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यासाठी स्टीवन स्मिथ व महेंद्रसिंह धोनी यांच्या बॅटमधून धावा झाल्या पाहिजेत. एम. आश्विन व थिसारा परेरा या फिरकी व जलद गोलंदाजांची कामगिरी प्रभावी राहिली आहे. त्यांच्या नावावर अनुक्रमे सात व सहा बळी आहेत. अशोक डिंडाने हैदराबाद विरोधात ३ बळी घेतले आहेत. मात्र, रविचंद्रन आश्विन आपली कमाल दाखविण्यात आत्तापर्यंत अपयशी ठरला आहे. त्यामुळे यांना गोलंदाजीत कमाल दाखवावी लागेल. खेळाडूंना लय मिळविण्यासाठी तसेच आत्मविश्वास येण्यासाठी गुजरातविरुद्धचा विजय मिळविणे आवश्यक आहे. >पुणे संघाला झटका स्टार फलंदाज फाफ डू प्लेसीसच्या डाव्या हाताच्या बोटाला फॅक्चर झाल्यामुळे पुढील आयपीएल स्पर्धेत तो खेळू शकणार नसल्यामुळे पुणे संघाला मोठा झटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी केव्हीन पिटरसनला दुखापतीमुळे बाहेर व्हावे लागले. आता डू प्लेसीसला बरे होण्यासाठी सहा आठवडे लागणार आहेत. दुसरीकडे पिटरसनच्या ऐवजी उस्मान ख्वाजाला संधी देण्यात येणार आहे. >रायझिंग पुणे सुपरजायंट्समहेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, उस्मान ख्वाजा, रविचंद्रन आश्विन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, इरफान पठाण, रुद्र प्रतापसिंग, रजत भाटिया, अंकित शर्मा, बाबा अपराजित, मुरुगन आश्विन, स्कॉट बोलँड, अंकुश ब्यास, अशोक डिंडा, जसकरम सिंग, ईश्वर पांडे, थिसारा परेरा, पीटर हँडस्कॉब व अ‍ॅडम झम्पा.>गुजरात लायन्ससुरेश रैना (कर्णधार), धवल कुलकर्णी, रवींद्र जडेजा, ब्रँडन मॅक्युलम, जेम्स फॉल्कनर, ड्वेन ब्राव्हो, प्रवीणकुमार, दिनेश कार्तिक, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, एकलव्य द्विवेदी, ईशान किशन, पारस डोग्रा, प्रदीप सांगवान, आकाशदीप नाथ, सरबजित लड्ढा, शादाब जकाती, शिवील कौशिक, जयदेव शाह, उमंग शर्मा, अँड्र्यू टे व प्रवीण तांबे.