शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलमध्ये पुणे पुन्हा अपयशी

By admin | Updated: May 12, 2016 02:49 IST

यशस्वी कर्णधार ठरलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीला रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाची मोट काही बांधताच आली नाही.

पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा तसेच या पूर्वीच्या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या सर्वहंगामात यशस्वी कर्णधार ठरलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीला रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाची मोट काही बांधताच आली नाही. त्यामुळे पुण्याचा संघ स्पर्धेत पुन्हा अपयशीच ठरला आहे. या पूर्वी आयपीएलमध्ये २०११ साली पुणे वॉरियर्स हा संघ मिळाला. सहाराची मालकी असलेला हा संघ तीन हंगाम खेळला. मात्र नावाजलेले खेळाडू असून देखील संघाला आपला प्रभाव पाडता आला नाही. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पुणे शहराला रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या रूपाने आपला हक्काचा संघ मिळाला. या संघाचे नेतृत्त्व भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार ठरलेल्या धोनीकडे देण्यात आले. या पूर्वी निलंबित चेन्नई सुपर किंग्ज संघाची धुरा धोणीवर होती. या संघासोबत असताना धोणीने अंतिम चार संघात प्रत्येक वेळी स्थान मिळविले. चेन्नईने २०१० व २०११ साली स्पर्र्धेचे जेतेपद संपादन केले. चॅम्पियन्स लीग देखील दोनदा जिंकली. तर चारदा उपविजेतेपद अशी धोणी ब्रिगेडची कामगिरी होती. मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सलामीच्या सामन्यात पुण्याने विजयी सुरूवात केली. मात्र त्यानंतरचे सलग चार सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर हैदराबाद सनरायझर्स विरुद्ध डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे विजय मिळाला. त्यानंतरचे दोन सामने गमावल्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध अखेरचा विजय मिळाला. त्यानंतर पुन्हा पराभवाची मालिका दहा मे रोजी झालेला हैदराबद विरुद्धच्या सामन्यापर्यंत कायम आहे. पुणे संघाने ११ सामन्यात ८ पराभव स्वीकारले आहेत. आता पुणे संघाचे दोन सामने शिल्लक असून १७ मे रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्स, तर २१ मे रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबशी लढत होईल. मात्र या दोन्ही सामन्यात विजय मिळविला तरी पुणे संघाला अंतिम चारात स्थान मिळविणे जवळपास अशक्य आहे. रायझिंग पुणे संघ देखील कागदावर बलाढ्य आहे. अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, केविन पीटरसन, फाफ डू प्लेसिस, आर. आश्विन या सारखे फलंदाज आहेत. दुखापतीमुळे प्लेसिस, स्मिथ, पीटरसन संघाबाहेर असल्याने पुण्याच्या डोकेदुखीत भरच पडली आहे. संघात ताळमेळ बसवण्यात अपयश येत असताना दुसरीकडे दुखापतीमुळे धोणीच्या अडचणीत भरच पडली. अजिंक्य रहाणेचा अपवाद वगळता कामगिरीत सातत्य ठेवण्याची किमया इतर फलंदाजांना करता आलेली नाही. हैदराबाद विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अ‍ॅडम अ‍ॅडम झंपाने सहा बळी घेत लक्षवेधक कामगिरी केली आहे. मात्र अखेरच्या क्षणी झंपा अस्त्र पुण्याच्या भात्यात आले आहे. संघाची गणिते नक्की कोठे चुकली याचा विचार संघव्यवस्थापन करेलच, मात्र या अपयशामुळे पुणे संघ पुन्हा तळाशीच राहण्याची शक्यता दाट आहे. (क्रीडा प्रतिनिधी)