राजेश मेहता, आसावरी जाधव यांना अग्रमानांकन

By Admin | Updated: June 17, 2016 03:09 IST2016-06-17T03:09:03+5:302016-06-17T03:09:03+5:30

पालघर जिल्हा कॅरम संघटना आयोजित पहिल्या पालघर जिल्हा कॅरम मानांकन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत विरारच्या राजेश मेहता व महिला एकेरी गटात वसईच्या आसावरी जाधव यांना अग्रमानांकन मिळाले आहे.

Priority to Rajesh Mehta, Asavari Jadhav | राजेश मेहता, आसावरी जाधव यांना अग्रमानांकन

राजेश मेहता, आसावरी जाधव यांना अग्रमानांकन

मुंबई : पालघर जिल्हा कॅरम संघटना आयोजित पहिल्या पालघर जिल्हा कॅरम मानांकन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत विरारच्या राजेश मेहता व महिला एकेरी गटात वसईच्या आसावरी जाधव यांना अग्रमानांकन मिळाले आहे.
महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत ज्युनिअर मुले व मुली, प्रौढ एकेरी, पुरुष एकेरी आणि महिला एकेरी अशा गटात लढती खेळविण्यात येतील. १७ जूनपासून विरार पश्चिम येथील श्री. भाऊसाहेब वर्तक सांस्कृतिक भवन सभागृहात या स्पर्धेचे सामने पार पडतील.
या स्पर्धेचे सामने अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या नवीन नियमानुसार होणार आहेत. ज्युनिअर मुलांच्या एकेरी गटात नालासोपाराच्या आशुतोष गिरी तर मुलींच्या गटात विरारच्या सोनल सावंतला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. प्रौढ गटात सुशील बांदिवडेकरला अग्रमानांकन मिळाले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Priority to Rajesh Mehta, Asavari Jadhav