शहरं
Join us  
Trending Stories
1
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
2
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
3
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
4
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
5
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
6
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
7
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
8
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
9
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
10
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
11
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
12
घरमालकाची बायको होती कॉलेज फ्रेंड, अनैतिक संबंधाचा संशय; तिसऱ्या मजल्यावरून 'ते' दोघे पडले कसे?
13
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
14
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
15
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
16
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
17
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
18
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
19
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
20
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षीय संघाच्या २९६ धावा

By admin | Updated: October 30, 2015 22:31 IST

टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकून कसोटी मालिकेतही विजय मिळवण्यासाठी सज्ज झालेल्या दक्षिण आफ्रिकेने दोनदिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारत अध्यक्षीय संघाचा डाव २९६ धावांत संपुष्टात आणला

मुंबई : टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकून कसोटी मालिकेतही विजय मिळवण्यासाठी सज्ज झालेल्या दक्षिण आफ्रिकेने दोनदिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारत अध्यक्षीय संघाचा डाव २९६ धावांत संपुष्टात आणला. यानंतर झटपट दोन बळी घेत भारत अध्यक्षीय संघाने दिवसअखेर द. आफ्रिकेची २ बाद ४६ अशी अवस्था केली. विशेष म्हणजे कसोटी मालिकेपुर्वी सरावाची संधी मिळालेल्या चेतेश्वर पुजाराने घोर निराशा करताना केवळ ५ धावा काढल्या. त्याचवेळी लोकेश राहुलने मात्र शानदार ७२ धावांची खेळी करुन भारतीय संघातील आपली दावेदारी मजबूत केली.ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारत अध्यक्षीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. सलामीवीर उन्मुक्त चंद, कर्णधार पुजारा आणि मध्यल्या फळीतील श्रेयश अय्यर स्वस्तात परतल्याने अध्यक्षीय संघाची ३ बाद २७ अशी अवस्था झाली होती. यानंतर राहूल आणि करुण नायर यांनी १०५ धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी करुन संघाला सावरले. खेळपट्टीवर चांगल्या प्रकारे स्थिरावला असल्याचे दिसत असतानाच नायरने खराब फटका मारुन विकेट फेकली. त्याने ७० चेंडूत ९ चौकारांसह ४४ धावा काढल्या. काहीवेळाने राहूलही बाद झाल्याने अध्यक्षीय संघाचा डाव ५ बाद १५५ असा घसरला. राहूलने १३२ चेंडूत १३ चौकारांसह ७२ धावांची खेळी केली. जॅक्सन आणि नमन ओझा यांनी सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. यावेळी ओझाने काही आकर्षक फटके मारले. जॅक्सन १५ धावा काढून बाद झाला तर ओझाने शानदार ५२ धावांची खेळी करताना ८० चेंडूत ७ चौकार व एक षटकार मारला. यानंतर हार्दिक पांड्या आणि जयंत यादव यांनी आठव्या विकेटसाठी वेगवान ५४ धावांची भागीदारी केली. हार्दिकने ५५ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांसह ४७ धावा फटकावल्या. तर यादवने चांगली साथ देत २२ धावांची खेळी केली. (क्रीडा प्रतिनिधी)