प्रार्थना-डार्ट यांना दुहेरीत विजेतेपद

By Admin | Updated: May 31, 2015 01:34 IST2015-05-31T01:34:35+5:302015-05-31T01:34:35+5:30

भारतीय फेड कप खेळाडू प्रार्थना ठोंबरे हिने आपली ब्रिटिश जोडीदार हॅरीयेट डार्ट हिच्या साथीने आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत विजेतेपद पटकावले.

Prayer-Dart won the doubles title | प्रार्थना-डार्ट यांना दुहेरीत विजेतेपद

प्रार्थना-डार्ट यांना दुहेरीत विजेतेपद

बालिकपापन : भारतीय फेड कप खेळाडू प्रार्थना ठोंबरे हिने आपली ब्रिटिश जोडीदार हॅरीयेट डार्ट हिच्या साथीने आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत विजेतेपद पटकावले.
प्रार्थना ठोंबरे आणि हॅरीयेट यांनी अंतिम सामन्यात थायलंडच्या
निशा एल. व एल. लुआंगनाम या जोडीचा ६-४, ४-६, १८-१६ असा पराभव केला.
हैदराबादेत सानिया मिर्झा अकॅडमीत सराव करणाऱ्या महाराष्ट्रातील बार्शीच्या प्रार्थना हिने या हंगामात अहमदाबाद येथे २५,००० डॉलर स्पर्धेच्या दुहेरीतही उपविजेतेपद मिळवले होते.
प्रार्थना म्हणाली, ‘‘मी हैदराबादेत एका महिन्यापासून सानिया मिर्झा टेनिस अकॅडमीत सराव करीत आहे आणि आज कठोर मेहनतीला फळ मिळाले. हे यश खूप विशेष आहे. ही चुरशीची लढत होती आणि ती जिंकल्याने मी आनंदित आहे.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: Prayer-Dart won the doubles title