शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यास दौरा

By admin | Updated: January 13, 2017 01:04 IST

अभ्यास दौरा

 

आमचा रिक्षाचा धंदा माझा लै आवडीचा. आमच्या रंगादादानं (आमच्या पेठेतला पलीकडल्या गल्लीतला माझा दोस्त) स्वत्ता रिक्षा काढता काढता मलाबी शिकवली आनि पैली रिक्षा घ्यून देन्यात मदत बी केली. रिक्षाच्या मडफ्ल्याप वरल्या झ्यांगप्यांग डिझाईन पास्नं ते मागल्या काचंवरल्या (डोक्याला ताण दिल्यावरच समजनाऱ्या) म्याटर पात्तूर आपलं बारीक लक्ष आसतंय, त्यामुळं चौकातल्या स्टॉप पास्नं आख्ख्या शिटीत बाजाची रिक्षा पेशल वळखली जातीया.परवा नागाळा पार्कात झेडपी आॅफिस जवळच्या स्टॉपवर रिक्षा लावून गिऱ्हाईकाची वाट बगत हुतो. लै वेळ हुबारून कंटाळा आला म्हनून म्हनलं जरा आत जाऊन आॅफिसचा अभ्यासदौरा करून यू... तर आत लै धांदल चाल्ल्याली! हे... सगळ्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात बरीच गावाकडली नेतेमंडळी लगबगीत दिसत हुतीत. आता पांढरा भटटीचा कडक शर्ट (आनि तेच्यापेक्षा कडक एक्स्प्रेशन) सगळीच पोश्टरबॉईज घालत्यात, त्यामुळं कार्यकर्ता कोंचा आनि सायेब कोंचे हे वळकायला हल्ली जरा अवघडच जातंय... पण साधारणपणे गराड्याच्या शेंटरला सायेब असत्यात हे जजमेंट आता आपल्याला आलंय. ह्या सभागृहाची टर्म सपत आल्यानं एकून्णच आॅफिसच्या आवारात कामं उरकन्यासाठी चाल्ल्याली घाई आनि धावपळ बगून मन भरून आलं. तेवढ्यात एका सायबांच्या साईडरचा चेहरा वळकीचा वाटला म्हणून निरखून बगितलं तर त्यो आमच्या आत्तीच्या दाजींचा पावना निगाला. सायेबांनी हातातलं कागद आनि सोत्ताच्या चेहऱ्यावरलं बेरिंग पावन्याच्या ताब्यात दिलं आनि सायेब दारातनं सभागृहात शिरलं. फुडं हून मी पावन्याला वळख सांगितली आनि तेच्या कडक हुब्या एक्स्प्रेशनला आडवी रेघ पाडली. ‘भागात कामांचा दनका दिसतोय?’ मी अंदाज घेत ईचारलं. ‘कामं काय, रोज्ची हाइतच की..!’ पावना. ‘त्ये न्हवं, आज सगळीच लै धांदलीत दिसत्यात.. ईषेश काय हाय काय?’ मी.‘अभ्यासदौऱ्याचं नियोजन.’ पावना.‘कसला अभ्यास? आनि दौरा कुनिकडं?’ माज्या या प्रश्नावर मी कंप्लीट अडानी असल्याचं सिद्ध करनारा लूक माझ्याकडं टाकत पावन्यातला सायडर म्हनला, ’ आरं जगात जिथं म्हनून भारी काम चाल्ल्यात तेंचं निरीक्षण करन्यासाठी दौरा काडायचा आनि आपल्या मतदारसंघात तशा टाईपनं काम हुतील हेचा अभ्यास करायचा यासाठी सायबास्नी बजेट दिल्यालं असतंय. तेचं नियोजन करन्यासाठी समदी घाई चाल्लीया.’’आसं व्हय...! खरं निवडून आल्या आल्या एक दोन वर्षात ह्यो अभ्यासदौरा आखला तर चालत न्हाई व्हय? म्हंजे केल्या अभ्यासाचं चीज करून इकासकामं करून दाखवायला नीट टाईम तर मिळतोय. आता फुडली इलेक्शन बी लागली. कवा दौरा आखनार? कवा अभ्यास करनार? आनि कवा इकासकामं करनार?’ माज्या या सरबत्तीवर इरोधकावर टाकावा तसा तुच्छ कटाक्ष टाकून पावना गुरगुरला, ‘बाज्या लेका कवातर माझ्याबरूबर राहून बग, मग कळल तुला भागातली इकासकार्य म्हंजे कसला कामांचा डोंगर असतो ते! सकाळी उठल्यापास्रं लोकं पोरग्याला नोकरीला लावा पास्नं बांधावरली भांडनं मिटवून द्या पात्तूर काय वाट्टेल ती कामं घ्यून येत्यात. तेच्यातनं भागातलं रस्तं, वीज, पानी, गटरी हेच्याकडं लक्ष द्याचं तर जेवायला टाइम मिळत न्हाई एकेकदा. तेच्यात इरोधकांची झोंबडी लै असत्यात. आता हेच बग की जरा सभागृहाच्या शेवटी शेवटी अभ्यासदौरा काडून कुटं फिरायला जावं म्हटलं तर हित्तंबी इरोधक हाईतच...त्येबी आमच्यातलंच. सायबांसारखं निवडून आल्यालंच.’ म्हटलं, ‘बरुबर हाय तुजं. हूंदे अभ्यासदौरा. शक्य आसंल तर फॉरेनलाच काडा. पुना असा चान्स घावल का न्हाई सांगता याचं न्हाई. खरं तुमचं सायेब या टायमाला इलेक्शन कोंच्या पक्षाकंडं लढवनार हाईत?’ तर म्हनला, ’ भुंगा चिन्ह घ्यून अपक्ष उभारन्याच्या नादात हाईत सायेब. अंदाज घ्यून कमळाकडं बी जाता येतंय.. न्हाईतर वाऱ्यासंगट बी फिरता येतंय.’भरत दैनी