शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्सिंग महासंघाची निवडणूक पुढे ढकलली

By admin | Updated: May 12, 2016 20:15 IST

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुकीची पुरेशी तयारी करण्यासाठी वेळ वाढवून दिल्याने दिलासा

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12- भारतीय बॉक्सर्सना आता रिओ आॅलिम्पिकमध्ये निर्धास्तपणे भाग घेता येईल. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुकीची पुरेशी तयारी करण्यासाठी वेळ वाढवून दिल्याने भारतीय बॉक्सिंग महासंघाला दिलासा मिळाला आहे. भारतीय बॉक्सिंग महासंघ संस्था म्हणून पंजीबद्ध होण्याच्या तयारीत आहे. एआयबीएने आधी भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या स्थानपनेसाठी १४ मेपर्यंतची वेळ दिली होती; पण येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करता या तारखेत वाढ करण्यास तत्त्वत: मान्यता प्रदान केली. बॉक्सिंग महासंघाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महासंघाच्या स्थापनेच्या कामाची प्रगती पाहता वेळ वाढवून दिली. नवी डेडलाइन मिळालेली नाही; पण आमच्या खेळाडूंना आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यापासून रोखले जाणार नाही, असे आश्वस्त केले आहे. नव्या महासंघात ३६ पैकी ३५ राज्य संघटना सहभागी होण्यास अनुकूल असल्याने भारतीय महासंघाच्या काम करण्याच्या पद्धतीवर आम्ही समाधानी आहोत, असे एआयबीएने स्पष्ट केले.बॉक्सिंग महासंघ डेडलाईनवरएआयबीएने आधीच्या वक्तव्यात १४ मे पर्यंत बॉक्सिंग महासंघ स्थापन न झाल्यास भारतीय खेळाडू रिओमध्ये खेळू शकणार नाहीत, असा इशारा दिला होता. आतापर्यंत शिवा थापा ५६ किलो हा एकच भारतीय बॉक्सर रिओसाठी पात्र ठरला आहे. दोन पात्रता स्पर्धा अद्याप शिल्लक आहेत. दरम्यान बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुकीची नोटीस २१ दिवसांपूर्वीच निघाली. या महिनाअखेर निवडणूक होईल. बॉक्सिंग फेडरेशनच्या स्थापनेत राष्ट्रीय क्रीडा संहितेचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे.