बांग्लादेशच्या शहादत हुसेनला अटक होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2015 04:44 IST2015-09-08T04:44:16+5:302015-09-08T04:44:16+5:30

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज व त्याच्या पत्नीवर घरकामासाठी असलेल्या ११ वर्षीय मुलीला मारपीट करण्याचा आरोप असून, या दाम्पत्याला अटक करण्यासाठी प्रयत्नशील

The possibility of arrest of Bangladeshi Shahadat Hossain | बांग्लादेशच्या शहादत हुसेनला अटक होण्याची शक्यता

बांग्लादेशच्या शहादत हुसेनला अटक होण्याची शक्यता

ढाका : बांगलादेशचा वेगवान गोलंदाज व त्याच्या पत्नीवर घरकामासाठी असलेल्या ११ वर्षीय मुलीला मारपीट करण्याचा आरोप असून, या दाम्पत्याला अटक करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी सांगितले, ‘रविवारी रात्री शहादतच्या घरी छापा मारला; पण तेथे कुणीच आढळले नाही.’ एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, ‘राष्ट्रीय क्रिकेटपटू शहादत हुसेन व त्याची पत्नी मला जाच करीत असल्याची तक्रार एका मुलीने दाखल केली आहे. एका पत्रकाराला ही मुलगी शहादतच्या घराजवळ आढळली. त्याने त्या मुलीला पोलीस ठाण्यात पोहोचवले. शहादत व त्याच्या पत्नीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर या मुलीने आजारी असल्याचे सांगितले.’
अधिकारी म्हणाले, ‘आम्ही या मुलीची तक्रार दाखल केली आहे. आम्हाला तिच्या शरीरावर जखमांचे व्रण दिसून आले. त्यानंतर तिला ताबडतोब ढाका वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वन स्टाप क्राइसेस सेंटरमध्ये पाठविण्यात आले. रविवारी रात्री शहादतच्या घरी छापा मारला; पण तेथे कुणीच आढळले नाही. त्याला अटक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’
शहादतने रविवारी मीरपूर पोलिसांकडे घरी काम करणारी मोलकरीण पळून गेल्याची तक्रार नोंदवली होती.
बांगलादेशतर्फे ३८ कसोटी व ५१ वन-डे सामने खेळणारा शहादत पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे अलीकडेच भारत व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांमध्ये खेळू शकला नाही. मीरपूरमध्ये शेरे ए-बांगला नॅशनल स्टेडियमनजीकच्या भागात त्याचे निवासस्थान आहे.
(वृत्तसंस्था)

Web Title: The possibility of arrest of Bangladeshi Shahadat Hossain