शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पाकने मालिका जिंकली

By admin | Updated: May 31, 2015 01:32 IST

: कर्णधार अजहर अलीच्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात येथे झिम्बाब्वेचा ६ गडी राखून पराभव करताना १७ महिन्यानंतर पहिली वन-डे मालिका जिंकली.

लाहोर : कर्णधार अजहर अलीच्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात येथे झिम्बाब्वेचा ६ गडी राखून पराभव करताना १७ महिन्यानंतर पहिली वन-डे मालिका जिंकली.अलीने त्याचे दुसरे वन-डे शतक ठोकताना १०४ चेंडूंत १०२ धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानने गद्दाफी स्टेडियमवर झिम्बाब्वेने दिलेले २६९ धावांचे लक्ष्य ४७.२ षटकांत पूर्ण केले आणि तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली.झिम्बाब्वेकडून पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या सिकंदर रजा याने ८४ चेंडूंत ८ चौकार, ३ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. चामू चिभाभा यानेदेखील त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी करताना ११ चौकार व एका षटकारासह ९९ धावांची खेळी केली. त्यामुळे त्यांचा संघ ७ बाद २६८ पर्यंत मजल मारूशकला.पाकिस्तानने लाहोरमध्ये पहिला सामना ४१ धावांनी जिंकला होता आणि तिसरा आणि अखेरचा सामना याच मैदानावर रविवारी खेळवला जाणार आहे.या मालिकेआधी पाकिस्तानने २ टी-२० सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली होती. त्याचबरोबर पाकिस्तानात ६ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धाही झाली.अलीने १०४ चेंडूंच्या खेळीत ८ चौकार मारले. त्याने त्याची सर्वोत्तम खेळीही केली. याआधी त्याने गेल्या महिन्यात ढाका येथे बांगलादेशविरुद्ध १०१ धावांची खेळी केली होती. अली बाद झाला तेव्हा पाकिस्तान विजयापासून ६० धावांनी दूर होता. अलीने सर्फराज अहमद (२२) याच्या साथीने सलामीसाठी ४६, असद शफिक (३९) याच्या साथीने तिसऱ्या गड्यासाठी ८५ व सोहेलबरोबर ५६ धावांची भागीदारी करताना संघाच्या विजयाचा पाया रचला.त्यानंतर हारिस सोहेलने ४९ चेंडूंत ६ चौकारांसह ५२ धावांची खेळी केली. तसेच त्याने शोएब मलिक (२० चेंडूंत नाबाद ३६) याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी ६० धावांची नाबाद भागदारी करताना संघाला विजय मिळवून दिला.त्याआधी रजाने शानदार खेळी केली. त्यामुळे झिम्बाब्वेने अखेरच्या ६ षटकांत ५९ धावांची भर त्यांच्या धावसंख्येत घातली. चिभाभा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ९९ धावांवर बाद होणारा पहिला झिम्बाब्वेचा खेळाडू ठरला. याआधी मॅल्कम वॉलेर, अ‍ॅलेस्टर कॅम्पबेल आणि अँडी फ्लॉवर यांनी ९९ धावा केल्या; परंतु हे तिघेही नाबाद राहिले होते. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : झिम्बाब्वे ५० षटकांत ७ बाद २६८. (सिकंदर रजा १००, चिभाभा ९९. वहाब रियाज २/५५, यासीर शाह २/४०).पाकिस्तान : ४७.२ षटकांत ४ बाद २६९. (अझहर अली १०२, हारिस सोहेल नाबाद ५२, शोएब मलिक नाबाद ३६, असद शफिक ३९. ग्रॅमी क्रेमर २/५२).