पाकिस्तानी हॉकी संघाच्या प्रशिक्षक आणि कर्णधाराची गुलाबाचे फुल देत माफी

By Admin | Updated: December 15, 2014 05:37 IST2014-12-15T05:37:15+5:302014-12-15T05:37:15+5:30

भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने एका गोलने विजय मिळवला असता मोहम्मद तौशीक आणि अमजद अली या खेळाडूंनी प्रेक्षकांना अश्लील हावभाव करून दाखवले.

Pak hockey team's coach and captain of the skull | पाकिस्तानी हॉकी संघाच्या प्रशिक्षक आणि कर्णधाराची गुलाबाचे फुल देत माफी

पाकिस्तानी हॉकी संघाच्या प्रशिक्षक आणि कर्णधाराची गुलाबाचे फुल देत माफी

ऑनलाइन लोकमत
भुवनेश्वर, दि. १४ - भारता विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने एका गोलने विजय मिळवला असता मोहम्मद तौशीक आणि अमजद अली या खेळाडूंनी प्रेक्षकांना अश्लील हावभाव करून दाखवले. त्यांच्या या अश्लील वागण्याला भारताचा हॉकी संघ, प्रसार माध्यमं आणि प्रेक्षकांनी आक्षेप घेतला असता आयोजकांनी पाकिस्तानी खेळाडूंवर निलंबनाची कारवाई केली. जर्मनीकडून पाकचा २-० असा धुव्वा उडाल्यावर पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक शेहनाझ शेख आणि कर्णधार मोहम्मद इम्ररान यांनी हातात गुलाबाचे फुल घेतले होते आणि पाकिस्तानी खेळाडूंच्या गैर वर्तनाबद्दल आम्ही भारताची गुलाब देऊन माफी मागतो असं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. कर्णधार मोहम्मदच्या हातात लाल गुलाबाचे फुल होते. भारताकडून पराभूत झाल्यावर पाकिस्तानच्या संघालाही अपमानास्पद वागणूक मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. भुतकाळाच्या गोष्टींना उजाळा देत न बसता आम्हाला प्रकरण मिटवायचे आहे असे मोहम्मद म्हणाला. याबाबत पत्रकारांनी अधिक प्रश्न विचारले असता प्रशिक्षक शेहनाझ यांनी मध्यस्थी करत भुतकाळातल्या गोष्टींना उजाळा का देता, असा प्रति प्रश्न पत्रकारांना केला. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही पत्र लिहून माफी मागत नसल्याचेही प्रशिक्षकांनी सांगितले. 
 

 

Web Title: Pak hockey team's coach and captain of the skull