पान ५- धारगळ येथे ९ रोजी घुमट आरती स्पर्धा

By Admin | Updated: November 1, 2014 21:48 IST2014-11-01T21:48:17+5:302014-11-01T21:48:17+5:30

बार्देस : देऊळवाडा-धारगळ येथे शांतादुर्गा देवस्थानच्या प्रांगणात मुरलीधर उत्सवानिमित्त दि. ९ रोजी पेडणे व बार्देस तालुका मर्यादित घुमट आरती स्पर्धा होणार आहे. प्रत्येक कला पथकामध्ये ८ ते १० कलाकार अपेक्षित. १५ मिनिटांचा वेळ असेल. सुरुवात श्लोकाने (शक्यतो कृष्णाचा) करावी. त्यानंतर गणपती, देवी व श्रीकृष्णाची अशा तीन आरती व गजर सादर करावा.

Page 5 - Dome Aarti competition at Dharangal on 9th | पान ५- धारगळ येथे ९ रोजी घुमट आरती स्पर्धा

पान ५- धारगळ येथे ९ रोजी घुमट आरती स्पर्धा

र्देस : देऊळवाडा-धारगळ येथे शांतादुर्गा देवस्थानच्या प्रांगणात मुरलीधर उत्सवानिमित्त दि. ९ रोजी पेडणे व बार्देस तालुका मर्यादित घुमट आरती स्पर्धा होणार आहे. प्रत्येक कला पथकामध्ये ८ ते १० कलाकार अपेक्षित. १५ मिनिटांचा वेळ असेल. सुरुवात श्लोकाने (शक्यतो कृष्णाचा) करावी. त्यानंतर गणपती, देवी व श्रीकृष्णाची अशा तीन आरती व गजर सादर करावा.
स्पर्धा सायंकाळी ६ वा. सुरू होईल. समाप्ती रात्री ११ पर्यंत होईल. दि. ८ रोजी सोडतीद्वारे क्रमांक काढून पथकाला फोनवरून कळविण्यात येईल. स्पर्धकांनी ३० मिनिटेपूर्व हजर राहावे. एक कलाकार एकाच पथकात सहभागी होवू शकतो. याकरिता रोख रकमेची सांघिक तसेच वैयक्तिक पारितोषिके आहेत. संपर्कासाठी लक्ष्मण केळकर, प्रकाश धुमाळ यांच्याकडून अर्ज घेऊन जावेत. स्पर्धेसाठी नाममात्र प्रवेश शुल्क आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Page 5 - Dome Aarti competition at Dharangal on 9th