मिश्र दुहेरीत पेस-हिंगीसला जेतेपद

By Admin | Updated: September 12, 2015 06:35 IST2015-09-12T06:04:08+5:302015-09-12T06:35:31+5:30

भारताचा टेनिसपटू लिअँडर पेस आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले.

Paes-Hingis win mixed doubles title | मिश्र दुहेरीत पेस-हिंगीसला जेतेपद

मिश्र दुहेरीत पेस-हिंगीसला जेतेपद

>ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १२ -  भारताचा टेनिसपटू लिएंडर पेस आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत प्रथम जेतेपद मिऴविणारी ही जोडी ठरली आहे. 
 
मिश्र दुहेरी सामन्याच्या अंतिम फेरीत लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीसने अमेरिकेची बेथानी माटेक सँड्स आणि सॅम क्वेरी या जोडीचा ६-४,३-६,१०-७ असा पराभव केला आणि ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरले.
 
लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीस या जोडीने यापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन विजेतेपद पटकावले होते. 

Web Title: Paes-Hingis win mixed doubles title