शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विश्वविक्रमाच्या बरोबरीपासून पेस वंचित

By admin | Updated: September 21, 2015 23:49 IST

सर्वांत अनुभवी भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस चेक प्रजासत्ताकाविरुद्ध विश्व ग्रुप प्ले आॅफ लढतीत दुहेरीच्या सामन्यात पराभूत होताच विश्वविक्रमाशी बरोबरी साधण्यापासूनही वंचित राहिला

नवी दिल्ली : सर्वांत अनुभवी भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस चेक प्रजासत्ताकाविरुद्ध विश्व ग्रुप प्ले आॅफ लढतीत दुहेरीच्या सामन्यात पराभूत होताच विश्वविक्रमाशी बरोबरी साधण्यापासूनही वंचित राहिला.लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा या अनुभवी जोडीला राडेक स्टेपनेक- अ‍ॅडम पाब्लासेक यांच्याकडून ५-७, २-६, २-८ असा पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने ही लढत १-३ अशी गमावली. यामुळे २०१६ च्या डेव्हिस चषकात भारताला आता आशिया-ओसेनिया झोनच्या ग्रुप- १ मध्ये खेळावे लागणार आहे. पेस या सामन्यात जिंकला असता तर इटलीचा निकोला पिएत्रांगेलो याच्या डेव्हिस चषकात ४२ दुहेरी सामने जिंकण्याच्या विक्रमाशी त्याला बरोबरी साधता आली असती. पेसने डेव्हिस चषकाच्या ५२ लढतींमध्ये ८९ सामने जिंकले असून, ३३ सामन्यांत त्याला पराभव पत्करावा लागला होता. एकेरीत त्याचे ४८ विजय आणि २२ पराभव, तर दुहेरीत ४१ विजय आणि ११ पराभव आहेत.१७ ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचा मानकरी असलेल्या पेसने दुहेरीचा सामना जिंकला असता तर पिएत्रांगेलोच्या ४२ विजयाशी त्याची बरोबरी झाली असती. ४२ वर्षांच्या पेसला पुढील वर्षी भारतीय डेव्हिस चषक संघात स्थान देण्यात येईल का, हे सांगणे कठीण आहे. भारतीय संघाचा कर्णधार आनंद अमृतराज याने दुहेरीतील पराभवानंतर पेस- बोपण्णा यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. आम्ही ही लढत दुहेरीचा सामना हरताच गमावली होती, असे अमृतराज यांनी शनिवारी म्हटले होते. पेस-बोपण्णा या अनुभवी जोडीकडून फार अपेक्षा होत्या; पण त्यांनी घोर निराशा केली. सामन्यात त्यांनी कुठलाही संघर्ष केला नाही. आम्ही सामना गमविणार, असे मनातही आले नसल्याचे अमृतराज यांचे मत होते.संघात साकेत मिनेनी आणि रामकुमार रामनाथन यांच्यासारखे युवा खेळाडू असल्याचे मत नोंदवीत अमृतराज यांनी पुढील वर्षी दुहेरीत परिवर्तन करण्याचे संकेतही देऊन टाकले होते.डेव्हिस चषक इतिहासात कारकिर्दीत सर्वाधिक विजय मिळविण्यात पेस हा जगात चौथ्या स्थानावर आहे. त्याच्यापुढे स्पेनचा मॅन्युअल संताना (९२ विजय), रोमानियाचा इली नस्तासे (१०९) आणि इटलीचा पिएत्रांगेली (१२० विजय) यांचा समावेश आहे. पेस यंदा न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत खेळला नव्हता. चेकविरुद्ध तो संघात परतला; पण त्याने जी दारुण कामगिरी केली, त्यामुळे ४२ वर्षांच्या पेसचे डेव्हिस चषक खेळण्यावर देखील प्रश्नचिन्ह लागले आहे.(वृत्तसंस्था)