शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पी. कश्यप, एच. प्रणय दुस-या फेरीत

By admin | Updated: April 10, 2015 08:39 IST

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन पारुपल्ली कश्यप आणि युवा खेळाडू एचएस प्रणय यांनी बुधवारी येथे आपापल्या लढती जिंकताना सिंगापूर ओपन

सिंगापूर : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन पारुपल्ली कश्यप आणि युवा खेळाडू एचएस प्रणय यांनी बुधवारी येथे आपापल्या लढती जिंकताना सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली.यंदा जानेवारीमध्ये सय्यद मोदी ग्रांप्री गोल्डचे विजेतेपद पटकावणाऱ्या कश्यपने कोरियाच्या ली ह्यू इल याचा २१-११, २१-१३ असा पराभव केला. पुढील फेरीत तो चौथ्या मानांकित सोन वॉन याच्याशी दोन हात करेल.अन्य लढतीत इंडोनेशिया मास्टर्स चॅम्पियन प्रणयने हाँगकाँगच्या वोंग विंग की विन्सेंट याला २१-२५, २१-१७ असे नमवले.ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील माजी चॅम्पियन जोडीनेदेखील दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित करताना कोरियाच्या आह रा आणि यू हेई वोन यांचा २१-१२, २१-१६ असा महिला दुहेरीत पराभव केला.तथापि, आरएमव्ही गुरुसाईदत्त आणि पीसी तुलसी यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभवाची चव चाखावी लागली.गुरुसाईदत्तने पहिला गेम जिंकल्यानंतरही त्याला सोन वॉन हो याच्याविरुद्ध २१-१६, १२-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. तुलसीला डेन्मार्कच्या लाईन जार्सफेल्टने अवघ्या ३५ मिनिटांत २१-१६, २१-१४ असे पराभूत केले.तरुण कोना आणि एन. सिक्की रेड्डी या भारताच्या मिश्र दुहेरीतील जोडीला पहिल्या फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले. या भारतीय जोडीला को सुंग ह्यून आणि किम हा ना या कोरियन पाचव्या मानांकित जोडीने एकतर्फी सामन्यात २१-१५, २१-१७ असे सहजरीत्या नमवले. (वृत्तसंस्था)