शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डीत दोन सुवर्णपदकांची संधी

By admin | Updated: October 3, 2014 01:22 IST

भारतीय महिला कबड्डी संघाने थायलंडचा 41-28 असा तर पुरुष संघाने यजमान कोरियाचा 36-25 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

इंचियोन : भारतीय महिला कबड्डी संघाने थायलंडचा 41-28 असा तर पुरुष संघाने यजमान कोरियाचा 36-25 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.  
आशियाई क्रीडा स्पर्धेतील कबड्डीच्या उपांत्य फेरीत भारताच्या महिलांनी थायलंडचा पराभव केला खरा पण त्याकरिता त्यांच्या नाकी दम आला. 13व्या मिनिटाला तर थायलंडने 13-12 अशी आघाडी घेतली होती. भारतीय संघाने सुरुवात तर झोकात केली होती. परंतु थायलंडने कडवी लढत दिली. मध्यांतराला दोन्ही संघ 14-14 असे बरोबरीत होते. मध्यांतरानंतर मात्र भारताने गिअर बदलला. मध्यांतरानंतर पहिला लोण चढवित भारताने 18-15 अशी आघाडी घेतली. ताबडतोब दुसरा लोण देत ती आघाडी 34-24 अशी वाढविली. शेवटी 41-28 असा सामना खिशात टाकला. भारताने चढाईत 19 गुण, बोनस 5, पकडी करीत 13 तर दोन लोणचे 4 असे 41 गुण कमविले तर थायलंडने चढाईत 11, पकडी करीत 6 तर 11 गुण बोनस करीत मिळविले. भारताच्या तेजस्विनीने 21 चढायांत 15 झटापटीचे तर 3 बोनस गुण मिळविले. 2  वेळा तिची पकड झाली. अभिलाषाने 5 चढायांत 2 गुण घेतले. एकदा तिची पकड झाली. किशोरीने 3 यशस्वी पकडी केल्या. भारताची अंतिम लढत बांगलादेशला 40-15 असे पराभूत करणा:या इराणशी होईल.
पुरुषांच्या उपांत्य फेरीत   भारताने यजमान कोरियाला 36-25 असे नमविले. भारताने बोनस गुणाने खाते खोलले परंतु कोरियाने त्यांना जशास तसे उत्तर देत कडवी लढत दिली. मध्यांतराला भारताकडे 14.12 अशी नाममात्र आघाडी होती. भारताने शेवटी आपला हुकमी चढाईचा खेळाडू अजय गफूरला खेळविले. त्याने आणि जसबीरने भारताला सुस्थितीत आणले.
 
मध्यांतरानंतर आला वेग
मध्यांतरानंतर 5व्या मिनिटाला लोण देत भारताने 23-14 अशी आघाडी घेतली. शेवटची 5 मिनिटे पुकारली तेव्हा 31-21 अशी 10 गुणांची आघाडी भारताकडे होती. भारताने चढायांत 17 गुण, यशस्वी पकडी करीत 9 गुण, 8 बोनस तर 1 लोण देत 2 गुण अशा प्रकारे गुण घेतले.  भारताच्या जसबीरने 16 चढायांत 9 झटापटीचे तर 2 बोनस मिळवला, 1 वेळा त्याची पकड झाली. अनुपने 10 चढायांत 3 झटापटीचे तर 3 बोनस गुण घेतले. 1 वेळा त्याची पकड झाली. भारताचा अंतिम सामना बांगलादेशला 40-15 असे पराभूत करणा:या इराणशी होईल.