शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिक पथक मोठे, पण अधिकाऱ्यांवर वचक : सोनोवाल

By admin | Updated: May 2, 2016 02:11 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये दहा पदके जिंकण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले असल्याचे सांगून यंदा भारत सर्वात मोठे पथक पाठवेल. त्याचवेळी अधिकाऱ्यांच्या संख्येवर विशेष लक्ष असेल, असे क्रीडा राज्यमंत्री

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये दहा पदके जिंकण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले असल्याचे सांगून यंदा भारत सर्वात मोठे पथक पाठवेल. त्याचवेळी अधिकाऱ्यांच्या संख्येवर विशेष लक्ष असेल, असे क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) सोनोवाल यांनी म्हटले आहे.काल रात्री आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या सहभोजन सोहळ्यात सोनोवाल म्हणाले,‘ यंदा ७७ खेळाडू रिओसाठी आतापर्यंत पात्र ठरले. ही संख्या १०० वर जाईल त्यामुळे सर्वांत मोठे पथक आॅलिम्पिकला जाईल, हे निश्चित झाले. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये ८३ खेळाडू सहभागी झाले होते. आॅलिम्पिक पथकासोबत मोठ्या संख्येने अधिकारी जातात, ही प्रवृत्ती नाहिशी करणार का, असा सवाल करताच ते म्हणाले,‘ आम्ही अधिकाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवणार आहोत. काहीही काम नसताना कुणी जाणार नाही, याची खबरदारी घेऊ. जे अधिकारी जातील त्यांचा उद्देश जाणून घेऊ . या उद्देशाची गरज आहे काय याची खात्री केल्यानंतरच पाठविण्याचा निर्णय घेण्यात येईल. ’कुठल्या खेळाकडून पदकाची अधिक आशा आहे, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले,‘ कुठल्या खेळात पदक मिळेल हे सांगणे कठीण आहे. पण लंडनमधील सहा पदकांच्या तुलनेत यंदा दहापेक्षा अधिक पदकांची अपेक्षा बाळगता येईल. एखाद्या खेळाडूकडून अधिक अपेक्षा बाळगल्यास त्या खेळाडूंवर अधिक दडपण येऊ शकते याची मला जाणीव आहे. आमचे खेळाडू कठोर सरावात व्यस्त असून पुढील तीन - चार महिन्यात त्यांची कामगिरी आणखी उंचावेल. ’ बीसीसीआयमध्ये पायाभूत सुधारणा घडवून आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या न्या. लोढा समितीच्या शिफारशी लागू करणे, क्रीडा विधेयक आणि खेळातील भ्रष्टाचार व अफरातफर याबाबतच्या विधेयकासंदर्भात सोनोवाल यांनी यावर सर्व संमतीची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या इंडियन ग्रॅण्डप्रिक्स अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेच्यावेळी वीज नसल्याने खेळाडूंचे रेकॉर्ड नोंदविण्यात अडचण आली. स्टेडियममध्ये बॅकअपची सुविधा नसल्यावरून वाद उद्भवला होता. यावर क्रीडामंत्री म्हणाले,‘ साईद्वारे बॅक सुविधा उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे.’ कुठल्याही आयोजनात अशा प्रकारच्या नाचक्कीचा सामना करावा लागू नये, अशी भावना त्यांनी बोलून दाखविली. हे स्नेहभोजन क्रीडामंत्री या नात्याने त्यांचा समारोप समारंभ तर नव्हे, असे विचारताच सोनोवाल यांनी हसून उत्तर देणे टाळले. आसामच्या विधानसभा निवडणुकीत सोनोवाल यांना भाजपने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले हे विशेष.(वृत्तसंस्था)