शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

ऑलिम्पिक पदकाचे ध्येय व मोबाईल न वापरण्याचा निर्धार!; यशात काका पवारांचे सर्वाधिक योगदान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 2:39 AM

नाशिकचे उपकार विसरणार नाही !

धनंजय रिसोडकरनाशिक : हर्षवर्धनचे रविवारी नाशकात आगमन होत असून, त्याचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. नाशिकच्या मातीचे उपकार कधीच विसरणार नाही, मदतीसाठी उभे राहिलेले माझे गुरू गोरखनाना बलकवडे यांच्यामुळेच मी महाराष्टÑ केसरीपर्यंत मजल मारू शकलो, असेही हर्षवर्धनने सांगितले.

कुस्तीची आवड आणि प्रारंभीचे प्रोत्साहन तुला कुणाकडून मिळाले?सदगीर : आजोबा पैलवान होते. त्यांनीच सर्वप्रथम माझ्यात कुस्तीची आवड निर्माण केली. जत्रेतील कुस्त्या खेळायला लागलो. तेथून मग मला वडिलांनी त्यांचे एक पैलवान मित्र बाळू जाधव यांच्याकडे नेले. तिथे त्यांनी माझी तयारी बघून मला भगूरला बलकवडे व्यायामशाळेत जाण्याचा सल्ला दिला.

भगूरच्या व्यायामशाळेत दाखल झालास, त्यावेळी काही ध्येय ठरवले होतेस का?सदगीर : त्यावेळी मला कुस्तीची अन् डावपेचांची माहिती नव्हती. त्यावेळी मोठे ध्येय काय असते, ते माहिती नव्हते. फक्त मोठा पैलवान बनायचं एवढाच विचार होता. २०१५ साली मला सैन्यदलातील नौकरी मिळाली होती. तेथील दिनक्रमात माझे कुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवले. त्यामुळे सहाच महिन्यांत मी सैन्यदलातील नोकरीचा राजीनामा दिला.

राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळायचे ठरविल्यावर कुस्ती प्रशिक्षणात काय बदल केले?सदगीर : विशाल बलकवडे या मार्गदर्शकांनीदेखील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सामन्यांचे व्हिडिओ दाखवून डावपेचांची माहिती देण्यास प्रारंभ केला. त्यातून प्रतिस्पर्धी मल्लांचा कसा अभ्यास करायचा, त्यांची बलस्थाने, कच्चे दुवे कसे लक्षात घ्यायचे त्याचे तंत्र समजून घेतले.

महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीसाठी तू नक्की काय डावपेच आखले होते?सदगीर : मी अंतिम फेरीत पोहोचल्यावर प्रतिस्पर्धापेक्षा माझ्याकडे स्टॅमिना अधिक असल्याचे मला माहिती होते. त्यामुळे प्रारंभीच्या तीन मिनिटांत त्याची केवळ तयारी पहायची, त्याला गुण मिळू द्यायचा नाही असेच धोरण ठरवले होते. ग्रीको रोमन खेळणारा मल्ल अनेकदा पटात कमजोर असतो. त्यामुळेच अखेरच्या तीन मिनिटांत चपळाईने संधी मिळाली की एकेरी पट काढायचा असे मी ठरवले होते.यशात काका पवारांचे सर्वाधिक योगदान आहे. दहा वर्षांहून अधिक काळ मी भगूरला प्राथमिक धडे गिरविले असून, पुण्यात काका पवारांकडे कुस्ती अधिक चांगली होईल, म्हणून नाना बलकवडे यांनी तीन वर्षांपूर्वी पुण्याला पाठविले. महाराष्ट्र केसरीनंतर आगामी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्यासाठी मोबाईलपासून दूर राहणार आहे. मी अनेक वर्षांपासून स्मार्टफोन वापरत नाही.

टॅग्स :Wrestlingकुस्तीMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा