तब्बल तीनदा ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या 'तिने' शेअर केला विवस्त्र फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 20:23 IST2019-09-19T20:22:55+5:302019-09-19T20:23:46+5:30
गोल्फ जगतातील अव्वल खेळाडू टायगर वूड्सबरोबर ती रिलेशनशिपमध्ये होती.

तब्बल तीनदा ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या 'तिने' शेअर केला विवस्त्र फोटो
नवी दिल्ली : ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणे, हीदेखील फार मोठी गोष्ट असते. ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणे हे सर्वात मोठे स्वप्न असते. पण एका महिला खेळाडूने तब्बल तीन ऑलिम्पिक पदके पटकावली आहे. पण याच खेळाडूने आता आपले विवस्त्र फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
अमेरिकेची लिंडसे वॉन ही एक स्की रेसर (बर्फांमधील शर्यत) आहे. आतापर्यंत वॉनने ऑलिम्पिकमध्ये तब्बल तीन पदकांची कमाई केली आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तर तब्बल 82 पदकं तिच्या नावावर आहेत.
गोल्फ जगतातील अव्वल खेळाडू टायगर वूड्सबरोबर वॉन ही रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर आता एका हॉकीपटूबरोबर तिचे अफेअर सुरु आहे. आपल्या इंस्टाग्रामवर तिने आपला विवस्त्र फोटो शेअर केला आहे.