नुबेहरशाह-लक्ष्मण लढत ड्रॉ

By Admin | Updated: February 29, 2016 02:14 IST2016-02-29T02:14:34+5:302016-02-29T02:14:34+5:30

Nubeharsh-Lakshman draws | नुबेहरशाह-लक्ष्मण लढत ड्रॉ

नुबेहरशाह-लक्ष्मण लढत ड्रॉ

>इथोस आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा
सोलापूर: र्शी रमा जगदिश महिला बहुउद्देशीय उत्कर्ष संस्थेच्या वतीने व सोलापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित इथोस आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित व माजी राष्ट्रकुल विजेता ग्रँडमास्टर आऱआऱ लक्ष्मणला मुंबईच्या मानांकित नुबेरशाह शेखने पहिल्या पटावर बरोबरीत रोखत स्पर्धेत खळबळजनक निकाल नोंदविला़
तसेच सहाव्या फेरीअखेर ग्रँडमास्टर आऱ आऱ लक्ष्मण, ग्रँडमास्टर शादरूल गागरे, नुबेरशाह शेख, सईद अन्वर, प्रतीक पाटील यांनी प्रत्येकी साडेपाच गुण प्राप्त करीत विजेतेपदासाठी चुरस निर्माण केली आह़े
आज झालेल्या सहाव्या फेरीअखेर पहिल्या पटावर नुबेरशाह शेख व आऱआऱ लक्ष्मण यांच्यातील निमझो इंडियन डिफेन्सने रंगलेल्या लढतीत नुबेरने लक्ष्मणच्या चालींना तोडीस तोड प्रत्युत्तर देत डावात गुंतागुंती निर्माण केली़ अखेर डाव समतोल स्थितीत असताना दोघानींही बरोबरी मान्य केली़ दुसर्‍या पटावर नाशिकचा विनोद भागवत व ग्रँडमास्टर शादरूल गागरे यांच्यातील चुरशीच्या लढतीत मध्य पर्वात विनोदने अश्वाच्या केलेल्या चुकीचा शार्दूलने अचुकरित्या फायदा घेत विजय मिळवला़
इतर महत्त्वाच्या लढतीत इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या प्रतीक पाटीलने सुरुवातीपासूनच आक्रमकरित्या खेळत पुणेच्या एस़ र्शीनिवास रावचा पराभव करीत साडेपाच गुणांसह स्पर्धेत आघाडी घेतली़ तसेच दहा वर्षीय मुंबईच्या शिव शोमने पुण्याच्या मानांकित प्रतीक मुळेला बरोबरीत रोखत सर्वांचे लक्ष वेधून घेतल़े सोलापूरचे ज्येष्ठ खेळाडू सुरेश जोशी यांनी कर्नाटकच्या अभय नाडगौडाचा, शाल्वी देशमुखने समाधान क्षीरसागरचा, चंद्रशेखर बसरगीकरने ठाण्याच्या यश भाटियाचा पराभव केला़ (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Nubeharsh-Lakshman draws