शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडची उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात

By admin | Updated: March 22, 2016 23:03 IST

मार्टिन गुप्टीलचे (८०) तडाखेबंद अर्धशतक आणि सॅनटर-मिल्ने यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने टी२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित करत पाकिस्तानला २२ धावांनी लोळवले.

ऑनलाइन लोकमतमोहाली, दि. २२ - सलामीवीर मार्टिन गुप्टीलचे (८०) तडाखेबंद अर्धशतक आणि मिशेल सॅनटर - अ‍ॅडम मिल्ने यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने टी२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित करत पाकिस्तानला २२ धावांनी लोळवले. यासह पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारीत षटकांत ५ बाद १८० धावांची आव्हानात्मक मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना पाकने ५ बाद १५८ धावा काढल्या. शारजील खान (४७) व अहमद शेहजाद (३०) यांनी आक्रमक ६५ धावांची भागीदारी करुन पाकिस्तानला शानदार सुरुवात करुन दिली. मात्र हे दोघेही बाद झाल्यानंतर पाकिस्तानवर दडपण वाढले आणि इतर फलंदाज संघाला विजयी करण्यापासून अपयशी ठरले. उमर अकमलने २४ धावांची संयमी खेळी करुन पाकच्या आशा कायम राखल्या. मात्र दडपणाखाली तो देखील अपयशी ठरला. सॅनटर व मिल्ने यांनी प्रत्येकी २ बळी घेत पाकला रोखण्यात मोलाचे योगदान दिले. तत्पूर्वी, गुप्टीलने कर्णधार केन विलियम्सनसह संघाला अर्धशतकी सलामी दिली. विलियम्सन व कॉलिन मुन्रो लवकर परतल्याने किवींचा डाव नवव्या षटकांत २ बाद ७५ असा घसरला. यानंतर गुप्टीलने कोरी अँडरसनसह ५२ धावांची भागीदारी केली. मोहम्मद सामीने गुप्टीलला त्रिफळाचीत करुन ही जोडी फोडली. गुप्टीलने ४८ चेंडूत १० चौकार व ३ षटकारांसह ८० धावांचा तडाखा दिला. अँडरसन (१४ चेंडूत २१ धावा) व रॉस टेलर (२३ चेंडूत नाबाद ३६) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे किवीला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. मोहम्मद सामी वशाहिद आफ्रिदी यांनी प्रत्येकी २ बळी घेत चांगला मारा केला. (वृत्तसंस्था)........................................संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड : २० षटकांत ५ बाद १८० धावा (मार्टिन गुप्टील ८०, रॉस टेलर नाबाद ३६, कोरी अँडरसन २१; मोहम्मद सामी २/२३, शाहिद आफ्रिदी २/४०) वि.वि. पाकिस्तान : २० षटकांत ५ बाद १५८ धावा (शारजील खान ४७, अहमद शहजाद ३०; अ‍ॅडम मिल्ने २/२६, मिशेल सॅनटर २/२९)