शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
4
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
5
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
6
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
7
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
8
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
9
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
10
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
11
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
12
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
13
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
14
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
15
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
16
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
17
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
18
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
19
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
20
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंड-आॅस्ट्रेलिया काट्याची लढत

By admin | Updated: June 2, 2017 00:58 IST

न्यूझीलंड संघाला आज (शुक्रवारी) गेल्या काही वर्षांतील आपल्या सर्वांत मजबूत वेगवान गोलंदाजी आक्रमणासह चॅम्पियन्स ट्रॉफी

बर्मिंगहॅम : न्यूझीलंड संघाला आज (शुक्रवारी) गेल्या काही वर्षांतील आपल्या सर्वांत मजबूत वेगवान गोलंदाजी आक्रमणासह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झालेल्या आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. आॅस्ट्रेलिया संघ जोश हेजलवूड, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क व जेम्स पॅटिन्सन या वेगवान चौकडीच्या जोरावर न्यूझीलंडविरुद्ध शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या लढतीत विजयी सुरुवात करण्यास प्रयत्नशील आहे.उभय संघांत प्रेरणादायी कर्णधार आहेत. आॅस्ट्रेलिया संघ स्टीव्ह स्मिथवर, तर न्यूझीलंड संघ केन विलियम्सनवर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. दोन्ही संघांत एकट्याच्या बळावर सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असलेल्या काही दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे; पण वेगवान गोलंदाजीबाबत चर्चा करता आॅस्ट्रेलिया संघाचे पारडे वरचढ भासत आहे. आॅस्ट्रेलिया संघासाठी चार वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेणे सोपे नाही. कारण, वेळोवेळी या गोलंदाजांना दुखापतींना सामोरे जावे लागणार आहे. आॅस्ट्रेलिया संघात जॉन हेस्टिंग्सच्या रूपाने आणखी एक उपयुक्त वेगवान गोलंदाज आहे. त्याला इंग्लंडमधील परिस्थितीची चांगली कल्पना आहे. अशा स्थितीत आॅस्ट्रेलिया संघ चार वेगवान गोलंदाजांसह खेळण्याची जोखीम पत्करू शकतो. हेजलवूड, कमिन्स, स्टार्क व पॅटिन्सन यांच्याकडून आॅस्ट्रेलियाला १९७० च्या दशकातील अँडी रॉबर्ट््स, मायकल होल्डिंग, कोलिन क्राफ्ट आणि जोएल यांनी विंडीजला जसे यश मिळवून दिले होते, त्याप्रमाणे यशाची अपेक्षा आहे. या चार वेगवान गोलंदाजांच्या आव्हानाला सामोरे जाणे न्यूझीलंड संघासाठी आव्हान आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली. मार्टिन गुप्टील, कर्णधार विलियम्सन आणि अष्टपैलू कोरे अँडरसन यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंंकेविरुद्ध ३५७ धावांचे लक्ष्य जवळजवळ ४६ षटकांत पूर्ण केले होते. न्यूझीलंड संघाची भिस्त विलियम्सन व अँडरसन यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. कारण, गुप्टील व रॉस टेलर यांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. न्यूझीलंड संघाची गोलंदाजीची भिस्त वेगवान गोलंदाज टीम साऊदी व ट्रेंट बोल्ट यांच्यावर अवलंबून आहे. अ‍ॅडम मिल्ने व कोलिन डी ग्रॅण्डहोम यांच्याकडूनही संघाला चांगल्या कामगिरीची आशा आहे. अँडरसन व जेम्स निशाम या अष्टपैलू खेळाडूंमध्ये न्यूझीलंड संघाचा समतोल साधला गेला आहे. आॅस्ट्रेलियाने मेलबोर्नमध्ये खेळल्या गेलेल्या अंंतिम लढतीत त्या पराभवाचा हिशेब चुकता केला होता. या दोन्ही सामन्यांत खेळणारे अनेक खेळाडू शुक्रवारी पुन्हा एकदा समोरासमोर असतील. (वृत्तसंस्था)आॅस्ट्रेलिया : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, अ‍ॅरोन फिंच, जॉन हेस्टिंग्स, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, मोझेस हेन्रिक्स, ख्रिस लीन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स पॅटिन्सन, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, अ‍ॅडम झम्पा. न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), कोरे अँडरसन, टे्रंट बोल्ट, नील ब्रूम, कॉलिन डी ग्रँडहोमे, मार्टिन गुप्टील, टॉम लॅथम, मिशेल मॅक्क्लेनघन, अ‍ॅडम मिल्ने, जेम्स नीशाम, जीतन पटेल, ल्युक राँची, मिशेल सँटनर, टिम साऊदी आणि रॉस टेलर.