शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

सल्लागार समिती घेणार नव्या प्रशिक्षकाचा शोध

By admin | Updated: July 6, 2015 01:41 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय)सल्लागार समिती टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध घेणार आहे. सल्लागार समितीपुढे ‘प्रशिक्षकाचा शोध’ हा अजेंडा ठेवण्यात आलेला आहे.

नवी दिल्ली : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुली आणि कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण सदस्य असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय)सल्लागार समिती टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध घेणार आहे. सल्लागार समितीपुढे ‘प्रशिक्षकाचा शोध’ हा अजेंडा ठेवण्यात आलेला आहे.बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले, ‘सल्लागार समितीची बैठक २९ जुलै रोजी होणार असून त्यात डंकन फ्लेचर यांचा वारसदार शोधण्याचा अजेंडा ठेवण्यात आला आहे. या पदासाठी जर आम्हाला योग्य उमेदवार गवसला तर बीसीसीआय सल्लागार समितीसोबत चर्चा करेल.’बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या प्रकृतीबाबत ठाकूर यांनी चिंता व्यक्त केली. ठाकूर म्हणाले, ‘पद सांभाळण्याच्या पहिल्या दिवसापासून मी आणि दालमिया चांगले काम करीत आहोत. संघटनेच्या कार्यात पारदर्शीता असणे आवश्यक आहे. निवड समितीच्या प्रत्येक बैठकीनंतर आम्ही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधतो.’(वृत्तसंस्था) सल्लागार समितीची पहिली बैठक ६ जून रोजी कोलकतामध्ये झाली होती. आता पुढील बैठक २९ जुलै रोजी होण्याची शक्यता असून त्यासाठी अद्याप स्थळ निश्चित झालेले नाही.’ टॉम मुडी यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याच्या प्रश्नाला गांगुली यांनी मात्र बगल दिली. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार मुडी यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता.- सौरभ गांगुली, माजी भारतीय कर्णधार मुडी प्रशिक्षकपदासाठी चर्चेत असलेले दुसरे आॅस्ट्रेलियनच्टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी चर्चेत असलेल्या टॉम मुडी दुसरे आॅस्ट्रेलियन आहेत. मुडी यांच्यापूर्वी जस्टिन लँगर यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली जाण्याची चर्चा होती, आॅस्ट्रेलियाच्या या माजी सलामीवीर फलंदाजाने टीम इंडियापेक्षा वेस्टर्न आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास प्राधान्य दिल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला. च्आता टॉम मुडी यांच्याबाबत चर्चा सुरू आहे. आॅस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू मुडी आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रशिक्षक आहेत. २००८ ते २०१० या कालावधीत त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. ४९ वर्षीय मुडी यांच्याकडे श्रीलंकेचा राष्ट्रीय संघ व वेस्टर्न आॅस्ट्रेलिया या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळण्याचा अनुभव आहे. टॉम मुडी यांच्याव्यतिरिक्त झिम्बाब्वेचे माजी फलंदाज अ‍ॅण्डी फ्लॉवर यांचेही नाव टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी चर्चेत होते.