शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

नेयमार मेस्सीचा चाहता

By admin | Updated: July 12, 2014 00:57 IST

अर्जेटिना व लियोनेल मेस्सीला जर्मनीविरुद्ध अंतिम फेरीत वर्चस्व गाजविताना व जेतेपदाचा मान मिळविताना बघण्यास उत्सुक असल्याचे मत ब्राझीलचा सुपरस्टार नेयमारने व्यक्त केले आहे.

टेरेसोपोलिस : अर्जेटिना व लियोनेल मेस्सीला जर्मनीविरुद्ध अंतिम फेरीत वर्चस्व गाजविताना व  जेतेपदाचा मान मिळविताना बघण्यास उत्सुक असल्याचे मत ब्राझीलचा सुपरस्टार नेयमारने व्यक्त केले आहे. 
येथे आयोजित पत्रकार परिषदेत नेयमार म्हणाला, ‘बार्सिलोनाचा सहकारी असलेल्या मेस्सीने रविवारी जर्मनीविरुद्धच्या अंतिम लढतीत जेतेपदाला गवसणी घालावी, अशी माझी इच्छा आहे.  तो माझा चांगला मित्र असून सहकारी खेळाडू आहे. माङयाकडून त्याला  शुभेच्छा.’
नेयमार म्हणाला, ‘विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीदरम्यान दुखापत झाली त्या वेळी मला अर्धागवायूचा झटका येईल, असे वाटत होते, पण दुखापत गंभीर नाही, त्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो. कारकिर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर दुखापत झाल्यामुळे निराश झालो. प्रतिस्पर्धी खेळाडूने मुद्दाम धक्का दिला असे मी म्हणणार नाही, पण फुटबॉलची जाण असलेल्यांना ही धडक साधी नव्हती, याची कल्पना आहे.’
पत्रकार परिषदेत भावुक झालेल्या नेयमारला विश्वकप स्पर्धेत मणक्याच्या हाडाला झालेल्या दुखापतीची आठवण झाली आणि त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. उपांत्य फेरीत जर्मनीविरुद्ध 7-1ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे यजमान ब्राझीलचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. (वृत्तसंस्था)