शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

नयनचे विजेतेपदाचे लक्ष

By admin | Updated: October 8, 2016 03:47 IST

कारी मोटार स्पीड-वेवर शनिवार व रविवारी होणाऱ्या १९ वी जेके राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबईच्या नयन चॅटर्जीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

कोईम्बतूर : येथील कारी मोटार स्पीड-वेवर शनिवार व रविवारी होणाऱ्या १९ वी जेके राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबईच्या नयन चॅटर्जीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.नयन सर्वांत जलद गटात आतापर्यंत अपराजित राहिला आहे. नयनने मागील दोन राऊंडमध्ये चार रेस जिंकत ५८ गुण मिळविले आहेत. तिसऱ्या राऊंडमध्ये चांगली कामगिरी करीत स्पर्धेच्या जेतेपदाची दावेदारी भक्कम करण्याकडे त्याचे लक्ष असणार आहे. नयनला बंगलोरच्या अनंत षणमुगम याच्याकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. त्याचे ४८ गुण आहेत. अनंतने मागील राऊंडमध्ये ३४ गुण मिळवित आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली होती.एकूण १५ स्पर्धकांमध्ये कोल्हापूरच्या धु्रव मोहिते (३९ गुण) तिसऱ्या, तर हैदराबादच्या अनिदिता रेड्डी (३८) चौथ्या स्थानी आहेत. हे दोघेही स्पर्धेचा निकाल बदलविण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. तरच त्यांना पुढील महिन्यात ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटनॅशनल सर्किटवर होणाऱ्या अंतिम राऊंडमध्ये सहभागी होता येईल. राष्ट्रीय गो कार्टिंगचा नवा विजेता रिकी डोनिसन या स्पर्धेत सातव्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या राऊंडमधील खराब कामगिरीमुळे त्याला एकही गुण मिळविता आला नव्हता. जेके मोटार स्पोटर््सचे अध्यक्ष संजय शर्मा म्हणाले, ‘चॅम्पियनशिपच्या लढतीत काय होईल, हे सांगणे कठीण आहे. कारण सर्वच ड्रायव्हर आपले कौशल्य पणाला लावतील. ही स्पर्धा रोमांचक होईल असे मला वाटते.’ एलजीबी फॉर्म्युला ४ मध्ये मेको रेसिंग व डार्क डॉन यांच्या दरम्यान रंगतदार लढत होईल. मेकोकडून विष्णू प्रसाद व राहुल रंगास्वामी, तर डार्क डॉनकडून रोहित खन्ना व अश्विन सुंदर स्पर्धेत उतरतील. विष्णू ३६ गुणांसह सर्वांत पुढे असून, राहुल २७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. जेके टुरिंग कार प्रकारातील निकाल अगदी स्पष्ट आहे. आशिष रामास्वामी (८०) गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून, राजाराम ४५ गुणांसह दुसऱ्या, तर राधा सेल्वाराजन (३७) गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.(वृत्तसंस्था)