शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नव्या मोसमासाठी नयन चॅटर्जी सज्ज

By admin | Updated: May 12, 2016 03:00 IST

भारताचा उदयोन्मुख रेसर नयन चॅटर्जी याने नुकताच मलेशिया येथे झालेल्या आशिया मॅक्स चॅम्पियनशिपमध्ये उपविजेतेपद पटकावून रेसिंग जगतात अभिमानाने तिरंगा फडकावला

मुंबई : भारताचा उदयोन्मुख रेसर नयन चॅटर्जी याने नुकताच मलेशिया येथे झालेल्या आशिया मॅक्स चॅम्पियनशिपमध्ये उपविजेतेपद पटकावून रेसिंग जगतात अभिमानाने तिरंगा फडकावला. यानंतर, आपल्या पुढील रेसिंगसाठी तो सज्ज झाला असून, आता २०१६-१७ मोसमासाठी त्याला भारताचे आघाडीचे रेसिंग गुरु अकबर इब्राहिम यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. आपल्या आगामी मोहिमेची माहिती देण्यासाठी, मुंबई आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या वेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन यांनी नयनला शुभेच्छा दिल्या.३० एप्रिल व १ मे दरम्यान झालेल्या दोनदिवसीय मलेशिया केआरएस - केकेएस एशिया रोटॅक्स मॅक्स चॅलेंज स्पर्धेत नयनने शानदार कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर, पुढील स्पर्धेसाठी त्याला इब्राहिम यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, भारताचे दोन आघाडीचे एफ वन रेसर नरेन कार्तिकेयन व करुण चंडोक यांनी आपल्या उमेदीच्या काळात इब्राहीम यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. वयाच्या १८व्या वर्षीय आंतरराष्ट्रीय कार्ट रेसर म्हणून स्वत:ची छाप पाडलेल्या नयनने आतापर्यंत एकूण २८ राष्ट्रीय ट्रॉफीवर कब्जा केला आहे. नयनच्या कामगिरीचे कौतुक करताना अझरुद्दिन यांनी सांगितले की, ‘रेसिंगविश्वात नयन भारताचे भविष्य आहे. या खेळामध्ये सर्व तरुणाईसाठी तो प्रेरणादायी ठरेल. त्याची तंदुरुस्ती जबरदस्त आहे.’’ (क्रीडा प्रतिनिधी)