शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गायलेले राष्ट्रगीत अभिमानास्पद

By admin | Updated: January 25, 2016 02:25 IST

दक्षिण आफ्रिकेत २००३ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात राष्ट्रगीत गायल्याचा क्षण माझ्या कारकिर्दीतील अभिमानास्पद होता

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत २००३ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात राष्ट्रगीत गायल्याचा क्षण माझ्या कारकिर्दीतील अभिमानास्पद होता, असे भारतरत्न सचिन तेंडुलकर याने सांगितले. त्याचप्रमाणे मुंबईत २०११ मध्ये झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात हजारो क्रिकेटप्रेमींच्या उपस्थितीमध्ये गायलेले राष्ट्रगीत अविस्मरणीय होते, असेही सचिनने सांगितले.रविवारी मुंबईत झालेल्या एका दिमाखदार कार्यक्रमात ‘द स्पोटर््स हिरोज’ या खेळाडूंच्या सहभागाने चित्रीत केलेले पहिलेवहिले राष्ट्रगीत व्हिडिओचे सचिनच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यामध्ये सचिनसह, माजी क्रिकेटपटू लिटल मास्टर सुनील गावसकर, माजी हॉकीपटू धनराज पिल्ले, नेमबाज गगन नारंग, टेनिसपटू महेश भूपती व सानिया मिर्झा, माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया आणि कुस्तीपटू सुशीलकुमार यांचा सहभाग आहे. माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांच्या पुढाकाराने या विशेष उपक्रमाची कल्पना साकारली गेली.जेव्हा कधी राष्ट्रगीताचा विषय निघतो तेव्हा प्रत्येक जण त्या वेळी मनापासून बोलतो. खेळाडू म्हणून राष्ट्रगीत नेहमीच प्रत्येकाला प्रेरित करीत असतो. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा सामना आणि २०११ चा विश्वचषक मुंबईतील अंतिम सामना याचप्रकारचा होता. या दोन्ही प्रसंगी स्टेडियममध्ये गायिलेल्या राष्ट्रगीताचा अनुभव वेगळाच आणि अविस्मरणीय होता, असे सचिन या वेळी म्हणाला. (क्रीडा प्रतिनिधी)आज आपण देशात सुरक्षित राहून आपली स्वप्न पूर्ण करू शकतो ते केवळ सीमारेषेवर सदैव देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आपल्या सैनिकांमुळे. त्यामुळे त्यांच्या बलिदानाचा विसर पडता कामा नये. देशाच्या तिन्ही दलाच्या सैनिकांचे मी खूप आभार मानतो आणि या उपक्रमातून त्यांना सर्व भारतीयांकडून सलाम करतो.- सचिन तेंडुलकरया अनोख्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा अभिमान आहे. ही व्हिडिओ प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल. जेव्हा दुसऱ्या देशात आपले राष्ट्रगीत गायिले जाते तेव्हा त्या क्षणासारखा दुसरा आनंदाचा क्षण कोणताच नसतो. - धनराज पिल्ले, माजी हॉकीपटूया मोहिमेचा खूप अभिमान आहे. ही व्हिडिओ प्रत्येकाच्या मनात देशभावना जागृत करेल. देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक ‘हिरो’ला ही एक मानवंदना आहे. खेळाडू म्हणून तिरंगा अभिमानाने फडकवण्याची जाणीव राष्ट्रगीतातून होते.- सुनील गावसकर, माजी क्रिकेटपटूपोडियमवर राष्ट्रगीताची धून ऐकत पदक स्वीकारणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि खेळाडू त्यासाठी पूर्ण प्रयत्न करीत असतात. देशवासीयांचा पाठिंबा आणि राष्ट्रगीतातून मिळणारी प्रेरणा यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो.- गगन नारंग, नेमबाज