शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नरसिंगने घेतली पंतप्रधानांची भेट

By admin | Updated: August 3, 2016 04:13 IST

भारतीय मल्ल नरसिंग यादवने राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) हिरवा कंदिल दिल्याच्या एक दिवसानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नवी दिल्ली : भारतीय मल्ल नरसिंग यादवने राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) हिरवा कंदिल दिल्याच्या एक दिवसानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी नरसिंगला तणाव न बाळगता आॅलिम्पिकमध्ये भारताचे नाव उंचावण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधानांनी भाजप संसदीय दलाच्या बैठकीनंतर संसद भवनामध्ये असलेल्या कार्यालयात नरसिंगची भेट घेतली. तुझ्यावर कुठला अन्याय होणार नाही, असे आश्वासन मोदी यांनी नरसिंगला यावेळी दिले. पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर नरसिंग म्हणाला,‘पंतप्रधानांनी मला शुभेच्छा दिल्या असून तणाव न बाळगता आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास सांगितले. देशासाठी पदक पटकावण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगताना पंतप्रधानांनी माझ्यावर कुठला अन्याय होणार नसल्याचे म्हटले.’’ २५ जून रोजी झालेल्या डोप चाचणीमध्ये नरसिंग अपयशी ठरला होता. माझ्याविरुद्ध कट रचण्यात आला, असा दावा नरसिंगने त्यावेळी केला होता. नरसिंग आता हा वाद विसरून आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावण्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रयत्नशील आहे. नरसिंग म्हणाला, ‘‘मी पंतप्रधानांचा आभारी आहे. त्यांनी माझे समर्थन केले. मला अडचणीच्या काळात पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचा मी आभारी आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यश येईल, अशी आशा आहे.’’ (वृत्तसंस्था)