शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मुरली, रहाणेने सांभाळले

By admin | Updated: December 18, 2014 05:14 IST

मुरली विजय (१४४) आणि अजिंक्य रहाणेच्या (७५*) धावांच्या बळावर भारताने बुधवारपासून सुरु झालेल्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या

ब्रिस्बेन : मुरली विजय (१४४) आणि अजिंक्य रहाणेच्या (७५*) धावांच्या बळावर भारताने बुधवारपासून सुरु झालेल्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सुरुवातीच्या झटक्यांपासून स्वत:ला सावरले. भारताने दिवसअखेर ४ विकेट्सच्या मोबदल्यात ३११ धावांचा समाधानकारक पल्ला गाठला.
दुखापतीतून सावरून कमबॅक करणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि चहापानापर्यंत ३ बाद १५१ धावा अशा दयनीय अवस्थेत संघ सापडला. भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८३ षटकांत चार बाद ३११ धावा बनविल्या. अजिंक्य रहाणे ७५ धावांवर, तर रोहित शर्मा २६ धावांवर खेळत आहे.
सलामीवीर मुरलीने भारताच्या डावाला आकार दिला आणि आपल्या कसोटी कारकिर्दीतले पाचवे शतक पूर्ण केले. मुरलीने २१३ चेंडूंत २२ चौकार लगावून १४४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुरलीने रहाणेसह चौथ्या विकेटसाठी १२४ धावांची मजबूत भागीदारी करून संघाला तीनशेचा पल्ला पार करून दिला. मुरलीचा आॅस्ट्रेलियाविरुद्ध हा चौथे कसोटी शतक आहे. याचबरोबर त्याने कसोटीत आपले २००० धावा पूर्ण केल्या. याआधी रहाणेने सहावा अर्धशतक पूर्ण केले. अ‍ॅडिलेड कसोटीत सामनावीराचा किताब पटकावणाऱ्या नॅथन लिआॅनने मुरलीला ब्रॅड हॅडिनकरवी झेलबाद करून माघारी धाडले. मुरली बाद झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोहितने ३४ चेंडूंत दोन चौकार व एक षटकार खेचून नाबाद २६ धावा केल्या.
तत्पूर्वी गॅबाच्या उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारताला या खेळपट्टीवर एकही कसोटी विजय मिळवता आलेला नाही. शिखर धवन पुन्हा फ्लॉप ठरला. ३९ चेंडूंत २४ धावा करणाऱ्या धवनला मिशेल मार्शने हॅडिनकरवी झेलबाद केले. धावफलकावर ५६ धावा असताना धवन माघारी परतला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा १८ धावांवर पहिलीच कसोटी खेळणाऱ्या जोश हेजलवुडच्या गोलंदाजीवर माघारी परतला.