शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राविरुद्ध मुंबईचा भक्कम प्रारंभ

By admin | Updated: October 17, 2016 20:49 IST

कर्नल सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्राविरुद्ध भक्कम प्रारंभ करताना मुंबईने सोमवारी, पहिल्या दिवशी ४ बाद २७३ धावा केल्या.

सी. के. नायडू क्रिकेट : ४ बाद २७३, शुभम रांजणेचे नाबाद अर्धशतकपुणे : कर्नल सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्राविरुद्ध भक्कम प्रारंभ करताना मुंबईने सोमवारी, पहिल्या दिवशी ४ बाद २७३ धावा केल्या. महाराष्ट्राचा माजी खेळाडू असलेला पुण्याचा शुभम रांजणे याने मुंबईतर्फे झळकावलेले नाबाद अर्धशतक आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर आजपासून ही ४ दिवसीय लढत सुरू झाली. बीसीसीआयतर्फे आयोजित २३ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेतील या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने महाराष्ट्राच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या संघाच्या ३ फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा १३७ चेंडूंत ३ षटकार आणि १० चौकार लगावणारा शुभम ८७ धावांवर, तर साईराज पाटील १२२ चेंडूंत १ षटकार व १० चौकारांसह ७८ धावांवर खेळ होते. सलामीवीर वैदिक मूरकर यानेही ५२ धावांचे (१२२ चेंडूंत ७ चौकार) योगदान दिले. महाराष्ट्रातर्फे प्रदीप दाढे याने प्रभावी मारा करताना ५८ धावांत ३ बळी घेतले.

आकर्षित गोमेल आणि वैदिक मूरकर यांनी मुंबईला ७४ धावांची सावध सलामी दिली. जगदीश झोपेने आकर्षितला पायचित करून महाराष्ट्राला पहिले यश मिळवून दिले. मुंबईने शतकाची वेस ओलांडल्यानंतर वैदिक प्रदीप दाढेच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्या वेळी मुंबईच्या २ बाद १०७ धावा झाल्या होत्या. याच धावसंख्येवर मुंबईचा कर्णधार एकनाथ केरकर याला शून्यावर बाद करून दाढेने महाराष्ट्राला मोठे यश मिळवून दिले. त्याने विक्रांत आवटीला बाद करून मुंबईची अवस्था ४ बाद १११ अशी केली.

अवघ्या ४ धावांच्या अंतरात ३ महत्वाचे फलंदाज बाद झाल्याने मुंबईचा संघ दबावाखाली आला होता. अशा कठीण परिस्थिीतीतून शुभम-साईश्राज जोडीने मुंबईला सावरले. त्यांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजांना समर्थपणे तोंड देत मुंबईला सामन्यात वर्चस्व मिळवून दिले. या जोडीने पाचव्या गड्यासाठी ४१.३ षटकांत नाबाद १७२ धावांची भागिदारी करीत महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा घामटा काढला.

संक्षिप्त धावफलक : मुंबई : पहिला डाव : ४ बाद २७३ (शुभम रांजणे खेळत आहे ८७, साईराज पाटील खेळत आहे ७८, वैदिक मूरकर ५२, आकर्षित गोमेल ३९, प्रदीप दाढे ३/५८, जगदीश झोपे १/७२).(क्रीडा प्रतिनिधी)